शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

विकासकामांसाठी १९ कोटी मंजूर

By admin | Published: July 13, 2017 1:43 AM

विकास विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे १९ कोटी ३ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्याता देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे १९ कोटी ३ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्याता देण्यात आली.स्थायी समिती सभागृहातील सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. २०१५-१६ मध्ये देय होणारी संचलनतूट समायोजन करण्याच्या अटीस अधीन राहून पीएमपीएमएलला उर्वरीत संचलनतुटीपोटी अदा करावयाच्या ५ कोटी ७२ लाख २१ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात विद्यालयांची शैक्षणिक सहल आयोजित केलेनुसार सायन्स पार्क व पीएमपीएमएल यांना अदा करण्यासाठी येणाऱ्या सुमारे १६ लाख ५२ हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता दिली. उद्यान विभागाकडील वृक्षारोपणासाठी मोठी रोपे पुरविणे व लागवड करून १ वर्षे देखभाल करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ८१ लाख ५६ हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.महापालिकेच्या उद्यानात व मैदानात ओपन जिमचे साहित्य खरेदी करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ११ लाख ७ हजार रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.महापालिका दवाखाने व रुग्णालयांसाठी आवश्यक असणारे औषधे तसेच साहित्य खरेदी करण्यासाठी येणाऱ्या सुमारे १० कोटी रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. जिजामाता रुग्णालयाच्या इमारतीस उच्चदाब वीजपुरवठा करण्यासाठी येणाऱ्या ४६ लाख १० हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. >संत तुकारामनगर प्रेक्षागृहातील वायुशितक वातानुकूल यंत्रणेचे नूतनीकरण करण्यासाठी येणाऱ्या सुमारे १ कोटी १२ लाख ४८ हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. सांगवी तसेच दापोडी मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत प्रभाग क्र. ६० येथे इनलेट चेंबर ते सांगवी व दापोडी पंप हाऊसपर्यंत मलनिस्सारण नलिका टाकण्यासाठी येणाऱ्या सुमारे ३६ लाख ४१ हजार रुपये, महानगरपालिकेच्या सर्व विभागाचे संगणकीकरण करण्यात आले असून सर्व्हेरची क्षमता वाढविण्याकामी ६ नग खरेदी व त्याचे एक वर्ष देखभाल दुरुस्ती करण्यासाठी येणाऱ्या सुमारे १८ लाख २१ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.