सुशांत मोरे
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीवरून दरवर्षी साधारण 1 लाख 30 हजार जणांचा मृत्यू रस्ते अपघातात होत आहे. ही संख्या 2008 सालापासून तर वाढत जाणारी आहे. अपघात झाल्यास तत्काळ न मिळणारी वैद्यकीय सुविधा यामुळेच अपघातात मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले जाते. 2008 साली 1 लाख 118 हजार 239 जणांचा मृत्यू रस्ते अपघातात झाला होता. तर 2012मध्ये हीच संख्या पाहिली असता 1 लाख 39 हजार 91 एवढी झाली आहे. यामध्ये तामिळनाडूसारखे राज्य आघाडीवर असून, 2012 मध्ये 16 हजार 175 प्राणांतिक अपघात झाले आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशचा नंबर लागत असून, 15 हजार 109 प्राणांतिक अपघात झाल्याचे ब्युरोच्या माहितीतून समोर आले आहे. महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागत असून, झालेल्या 60 हजार अपघातांपैकी 13 हजार 333 आणि 2013मध्ये 12 हजार 187 प्राणांतिक अपघात आहेत. महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेतला असता राज्यात 15 राष्ट्रीय महामार्ग असून, 291 राज्य महामार्ग आहेत. हे सर्व रस्ते 33 हजार 165 किलोमीटर्पयत पसरलेले आहेत. राज्यातील एकूण महामार्गापैकी पाच महामार्ग हे सर्वात धोक्याचे समजले जातात. यात मुंबई-पुणो, मुंबई-कोल्हापूर, मुंबई-आग्रा, मुंबई-अहमदाबाद आणि पुणो-सोलापूर-हैदराबादचा समावेश आहे. या महामार्गावरून प्रवास करणो म्हणजे एक प्रकारे अपघातालाच निमंत्रण देण्यासारखे आहे. या पाचही महामार्गावर सव्वा वर्षात साडेपाच हजार अपघात झाले असून, तब्बल 1 हजार 761 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मुख्य बाब म्हणजे मुंबई-आग्रा आणि मुंबई-कोल्हापूर महामार्ग सर्वाधिक आघाडीवर आहेत. हे अपघात पाहता अजूनही हे अपघात कमी करण्यासाठी ठोस असे पाऊल उचलण्यात आले नसल्याचेच दिसून येते.
रेल्वेपेक्षा रस्ते अपघात अधिक
रेल्वे अपघातात मृत्यू होणा:यांचे प्रमाण अधिक असल्याची ओरड नेहमीच केली जाते. अपघात जास्त होत असल्याने आणि प्रवाशांना वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने अनेकांचा बळी जात असल्याचे सांगितले जाते. रेल्वेचा आवाका आणि प्रवासी संख्या पाहिली असता रेल्वे प्रशासनाकडूनही प्रवाशांना तशी मदत दिली जाते. मात्र तुलनेने पाहता रस्ते अपघातात मृत्यू पावणा:यांची संख्या आणि त्यांना मिळणा:या वैद्यकीय सुविधा यात फारच तफावत असल्याचे दिसते.
दरवर्षी देशभरातील रेल्वे अपघातांत साधारण 15 हजार ते 18 हजार जणांचे बळी जात आहेत. हे अपघात रोखण्यास रेल्वेकडून अनेक उपाययोजना केल्या जातात. यासाठी रेल्वेकडून साधारणपणो 1 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वापरला जातो. तसेच रेल्वेच्या अर्थसंकल्पातही अपघात रोखण्यासाठी मोठी तरतूद केली जाते. दुर्दैवाने रस्ते अपघाताबाबत तसे काही होताना दिसत नाही.
राज्यातील रस्ते अपघातात प्रत्येक वर्षी 2 ते 3 हजार तरुणांचे बळी जात आहेत.दारू पिऊन वाहन चालवणो, ओव्हरटेक करणो, अधिक वेगाने वाहन चालवण्यामुळे महामार्गावर मोठय़ा प्रमाणात अपघात होत आहेत.