शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांना काँग्रेसने दोनदा मुख्यमंत्रीपद दिले पण पक्ष संकटात असताना ते भाजपात गेले"
2
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
3
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
4
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
5
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
6
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
7
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
8
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
10
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
11
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
12
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
14
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
15
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
16
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
17
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
18
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
19
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
20
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...

राज्यात विसर्जनावेळी १९ जणांचा बुडून मृत्यू

By admin | Published: September 17, 2016 2:46 AM

गणरायाला निरोप देताना राज्यात विविध दुर्घटनेत १९ जणांचा बुडून मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू झाला.

मुंबई : गणरायाला निरोप देताना राज्यात विविध दुर्घटनेत १९ जणांचा बुडून मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू झाला. त्याखालोखाल खान्देशात सहा, नगर आणि पुणे जिल्ह्यात प्रत्येकी दोन आणि मुंबईत एकजण बुडाला. सिन्नर तालुक्यातील मुसळगावमधील साठवण बंधाऱ्यात विसर्जनावेळी एक तरुण बुडत असताना पाहून लष्कराचा जवान संदीप सिरसाट याने पाण्यात उडी घेतली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने रामेश्वर शिवाजी सिरसाट (३१), संदीप अण्णा सिरसाट (२५) यांचा बुडून मृत्यू झाला़ वालदेवी फाट्याजवळील खाणीत नीलेश साईनाथ पाटील ( २५) बुडाला. मालेगाव तालुक्यात सुमित कांतीलाल पवार (१४) व सचिन लहू देवरे (१६) पाण्यात बुडाले.त्र्यंबकेश्वर तालुक्यात भूषण हरी कसबे (१७), अमोल साहेबराव पाटील यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नाशिकमधील गंगापूररोडवरील जलाशयात रोशन रतन साळवे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला़ अहमदनगर जिल्ह्यात प्रवरासंगम येथे गोदावरी नदीत परमेश्वर विठ्ठल शेंगुळे (२६, रा. वाळुंज, जि. औरंगाबाद) हे शिक्षक पोहता येत नसल्याने बुडाले. संगमनेर तालुक्यातील माहुली येथे शाहरुख राजमहम्मद सय्यद (२१) हा तलावात बुडून मृत्यू पावला़ पुण्यात पिंपळे सौदागर येथील देवी आई माता व दत्त मंदिर घाटावर शंकर हुसेन लोखंडे (४८) नदीपात्रात बुडाले. विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात शुक्रवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला.मुंबईत तिघांचा मृत्यूमुंबईत कांदिवली येथे गुरुवारी रात्री विसर्जन मिरवणुकीत ताशा वाजवणारा अजय खारवा (१८) हा तरुण चक्कर येऊन पडला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तर विसर्जन मिरवणुकीत चक्कर येऊन पडलेल्या प्रवीण पवार(२६) याला गोवंडीतल्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. कुर्ला पश्चिमेकडील शीतल तलावात गणेशविसर्जनावेळी एक तरुण बुडाला. भांडूप खिंडीपाडा येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत जनरेटर सेटला आग लागली. त्यात नऊ मुले जखमी झाली. विदर्भात दोघांचा मृत्यूब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा खेड येथील राहुल सुखदेव आत्राम (२५) हा युवक शेळ््या पाण्याबाहेर काढताना गोसीखुर्द नहराच्या पाण्यात बुडाला. तर पोंभुर्णा येथे तलावात पोहण्यासाठी गेलेला महेश गोपीनाथ गौरकार (१६) हा विद्यार्थी पाण्यात बुडाला. पुण्यात दोन जण बुडालेपुण्यात गणेश विसर्जनावेळी धायरी पुलाखालील कालव्यामध्ये बुडून पवन वसंत गायकवाड (वय २०, रा. धायरी) याचा मृत्यू झाला. खडकी येथील शस्त्र निर्माण फॅक्टरीमागे विसर्जनाकरिता गेलेला एक युवक बुडाला. त्याचेही अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू असून त्याचे नाव समजू शकले नाही.खान्देशात ६ जणांचा बुडून मृत्यूखान्देशात सहा जणांचा बुडून मृत्यू झाला. यात धुळे व जळगाव जिल्ह्यातील प्रत्येकी तिघांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात जामनेर येथे कांग नदीत दोन युवक तर भुसावळ येथे तापी नदीत एक ४५ वर्षीय इसम बुडाला. धुळे जिल्ह्यात निमडाळे व रतनपुरा येथील युवक विसर्जनादरम्यान तालावात बुडाले तर सिताणे येथील म्हसोबा तलावात आणखी एक जण बुडून मरण पावला. निमडाळे येथील तलावाच्या पाण्यात बुडाल्याने तरुणाचा मृत्यू झाला़नाशिक : जलप्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेसह विविध स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या आवाहनाला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत अनंत चतुर्दशीला दोन लाख ३९ हजार २२८ गणेशमूर्तींचे दान केले. महापालिकेने ठिकठिकाणी उभारलेल्या केंद्रांवर दिवसभरात १६९ टन निर्माल्य उचलले. पुणे महापालिकेच्या धर्तीवर महापालिकेसह स्वयंसेवी संस्थांनी उपलब्ध करून दिलेल्या अमोनियम बायकार्बोनेट पावडरलाही नागरिकांनी प्रतिसाद देत इको फ्रेंडली गणेश विसर्जनाचा प्रयोगही करून पाहिला. मूर्ती संकलनासाठी काही केंद्रांवर स्वत: महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्यासहआयुक्त अभिषेक कृष्ण यांनी उपस्थित होते.