अकोला : छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील १९१ शेतक-यांना कर्जमाफी मिळाली. उर्वरित पात्र शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याचे काम सुरू आहे.अकोला जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदार ६५ शेतक-यांच्या कर्ज खात्यात २२ लाख ७१ हजार ६२६ रुपये रक्कम जमा करण्यात आली. जिल्ह्यात १ लाख ९१ हजार १८७ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले. वाशिम जिल्ह्यात ५५ शेतकºयांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, उर्वरित पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी मंजूर यादी (ग्रीन लिस्ट)ची पडताळणी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील एकूण २ लाख ६० हजार शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली असली, तरी प्रत्यक्षात १ लाख २७ हजार शेतकºयांनीच अंतिम मुदतीपर्यंत आॅनलाइन अर्ज भरले. बुलडाणा जिल्ह्यातील २ लाख ५५ हजार शेतकरी कुटुंबे हे कर्जमाफीसाठी पात्र ठरलेले आहेत. आतापर्यंत प्रत्यक्षात ७१ शेतकºयांना कर्जमाफी झाली व त्यांचे खाते नील झाले आहे.>सिंधुदुर्गात अद्याप एकाही शेतक-याला लाभ नाहीकर्जमाफीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३६ हजार २१२ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी ४,१५८ शेतकºयांची पहिली यादी प्रशासनाला प्राप्त झाली आहे. मात्र, अद्याप एकाही शेतकºयाच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही.रत्नागिरीत ३०६ शेतकºयांना ८४ लाख रुपयांची कर्जमाफीरत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ६१ हजार ४४१ शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरले होते. यासाठी कर्जमाफीची रक्कम १४२ कोटी ६४ लाख निश्चित करण्यात आली होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जमाफी झालेल्या ३०६ शेतकºयांची ‘ग्रीन लिस्ट’ जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्राप्त झाली. या शेतकºयांच्या कर्जापोटी एकूण ८४ लाख रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले.
पश्चिम व-हाडात १९१ शेतक-यांना कर्जमाफी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 5:36 AM