शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

१९९३ बॉम्बस्फोट खटला; कोर्टाबाहेर तणाव आणि उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 4:35 AM

१९९३च्या बॉम्बस्फोट खटल्यातील गुरुवार हा निकालाचा दिवस असल्याने नेमका निकाल काय लागतो, याविषयी सेशन कोर्टाबाहेर तणाव आणि उत्सुकता असे वातावरण दिसत होते.

मुंबई : १९९३च्या बॉम्बस्फोट खटल्यातील गुरुवार हा निकालाचा दिवस असल्याने नेमका निकाल काय लागतो, याविषयी सेशन कोर्टाबाहेर तणाव आणि उत्सुकता असे वातावरण दिसत होते. कोर्टाबाहेर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी होती, तशीच सर्वसामान्य लोकांनीही मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या खटल्यातील आरोपी अबू सालेमसह अन्य आरोपींना नेमकी किती शिक्षा सुनावली जाणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले होते. संपूर्ण न्यायालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.मुख्य प्रवेशद्वारापासून ते गेट क्रमांक ५पर्यंत पोलीस तैनात होते. जसजशी आरोपींना शिक्षा सुनावण्यास सुरुवात झाली, तशी बघ्यांचीही उत्सुकता वाढत गेली. सरकारी वकील उज्ज्वल निकम आरोपींच्या शिक्षेबाबत कधी माहिती देतात, याकडेही सर्वांचे लक्ष होते.देशात दहशतवादाला थारा नाहीज्या बॉम्बस्फोटांतील आरोपींना शिक्षा मिळाली आहे त्यांनी मोठे षड्यंत्र रचले होते. देशाच्या विरोधात मोठा गुन्हा केला होता. यापैकी दोघांना फाशी झालेली आहे. अन्य आरोपींना जन्मठेप झालेली आहे. पीडितांना आणि मुंबईला न्याय मिळाला आहे. जे देशाच्या विरोधात आहेत; त्यांना चांगलाच संदेश या शिक्षेमुळे जाईल. देशात कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला थारा दिला जाणार नाही.- शाहनवाज हुसैन, ज्येष्ठ भाजपा नेतेउशिरा का होईना न्याय मिळालाबॉम्बस्फोटासारखे भयंकर कृत्य करणाºया दहशतवाद्यांना शिक्षा मिळायलाच हवीहोती. न्यायालयाच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. निकालासाठी खूप उशीर झाला; पण १९९३ बॉम्बस्फोटांतील पीडितांना अखेर न्याय मिळाला.- सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्रीनिकालाबाबत समाधानीया खटल्यात दोन आरोपींना फाशीची शिक्षा मिळाल्याचे समाधान आहे. अजून एक फाशी मी मागितली होती, न्यायालयाने त्या आरोपीस जन्मठेप सुनावली. जन्मठेप देताना न्यायालयाने काय म्हटले आहे, हे निकालपत्र वाचल्याशिवाय सांगता येणार नाही. अबू सालेमलाही जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. अन्य एका आरोपीला जन्मठेप मागितल्यानंतर न्यायालयाने त्याला १० वर्षांची शिक्षा सुनावली.- दीपक साळवी, सीबीआयचे वकील

टॅग्स :Mumbaiमुंबई