ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 9 - पोहता न आल्याने मुलूुंडमधील दोन अल्पवयीन मुलांचा ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलावात बूडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे ही घटना पाहणा-या त्यांच्या सवंगडयांनी मात्र भीतीने तिथून धूम ठोकली. त्यांच्या या साथीदारांचाही शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यश रवि खरात (10) आणि प्रश सचिन शिंदे (15) रा. दोघेही अशोक नगर, मुलूंड अशी तलावात बुडालेल्या दोघांची नावे आहेत. दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास हे दोघे आणि त्यांचे आणखी तीन साथीदार असे पाच जण रायलादेवी तलावात पोहण्यासाठी उतरले होते. यश आणि प्रश यांच्यापैकी एकाला पाण्याचा नेमका अंदाज न आल्याने एकजण गटांगळया खात असल्याचे दुस-याने पाहिले. तेंव्हा हे दोघे एकमेकांना वाचविण्याच्या प्रय}त खोल पाण्यात बुडाले. सुरुवातीला यांच्याच बरोबर आलेल्या इतर तिघांनी आरडाओरडा केल्याने स्थानिक रहिवाशी आकार पाटील हे बुडालेल्या दोघांना वाचविण्यासाठी पुढे सरसावले. परंतू, नेमकी कोणत्या ठिकाणी ते बुडाले याचा त्यांनाही अंदाज न आल्याने त्यांनी अखेर अगिशमन दल आणि पोलिसांना पाचारण केले. दुपारी 4 ते सायंकाळी 5 या एक तासांत ठाणो महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने अगिशमन दलाच्या मदतीने या दोघांचेही मृतदेह तलावातून बाहेर काढले. ठाण्याच्या विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनानंतर त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सिताराम वाघ यांनी दिली.