शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
4
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
5
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
6
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
7
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
8
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
9
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
10
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
11
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
12
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
13
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
14
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
15
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
16
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
17
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
18
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
19
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
20
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू

भाविकानं साईंचरणी अर्पण केल्या 2 किलो सोन्याच्या पादुका

By admin | Published: July 08, 2017 1:00 PM

गुरुपौर्णिमेनिमित्त एका साईभक्त दाम्पत्यानं शिर्डीतील साईबाबांच्या चरणी तब्बल 2 किलो सोन्याच्या पादुका अर्पण केल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत
शिर्डी, दि. 8 - गुरुपौर्णिमेनिमित्त एका साईभक्त दाम्पत्यानं शिर्डीतील साईबाबांच्या चरणी तब्बल 2 किलो सोन्याच्या पादुका अर्पण केल्या आहेत. ""एबीपी माझा""ने दिलेल्या वृत्तानुसार, आग्रा येथील रहिवासी अजय गुप्ता आणि संध्या गुप्ता या दाम्पत्यानं या 2 किलो सोन्याच्या पादुका अर्पण केल्या आहेत.  साईभक्त असलेल्या गुप्ता दाम्पत्यानं यापूर्वी साईंच्या चरणी 70 किलो चांदींचे सिंहासन अर्पण केले होते. 
 
यापूर्वी साईंच्या चरणी मंदिरासाठी सोन्याचा कळस, सुवर्ण सिंहासन, साई समाधीसाठी सोन्याचे कठडेही दान करण्यात आले आहेत.  शिर्डीतील साईबाबांना प्रत्येक उत्सवात मोठ्या प्रमाणात सोनेचांदीच्या वस्तू दान स्वरुपात येतात. यंदादेखील गुरूपौर्णिमेनिमित्त  भाविकांनी अनेक सोन्या-चांदीच्या वस्तू साईंचरणी अर्पण केल्या आहेत. 
 
 
 
 
 
 
बत्तीस कोटींच्या दोन इमारती साईबाबा संस्थानला अर्पण
तर,  मे महिन्यात विरारच्या ओम साईधाम ट्रस्टने शिर्डीजवळ उभारलेल्या साई पालखी निवाऱ्यातील दोन इमारती साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिल्या आहेत. सरकारी दरानुसार या इमारतींची बत्तीस कोटींहून अधिक किंमत आहे. संस्थानच्या इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची मोठी देणगी ठरणार आहे.
 
डॉ. सुरेश हावरे यांच्या अध्यक्षतेखालील संस्थानचे व्यवस्थापन मंडळ या इमारतीत राज्यातील गोर-गरीब, आदिवासी, वंचित, दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आय. ए. एस. अकादमी सुरू करणार आहे. विरारच्या ओम साईधाम मंदिर ट्रस्टने शिर्डीला येणाऱ्या पदयात्रींसाठी शिर्डीजवळ २००८ मध्ये साईपालखी निवारा उभारला आहे. येथे पदयात्रींना निवास व भोजनाची मोफत सेवा पुरवण्यात येते़ आमदार हितेंद्र ठाकूर संस्थापक अध्यक्ष असलेल्या या ट्रस्टमध्ये काशिनाथ गोविंद पाटील, शेखर नाईक, प्रदीप तेंडोलकर, मोहन मुदलियार आदी विश्वस्तांचा समावेश आहे.
 
यातील पाटील (रा. कोपरी, तालुका वसई, जिल्हा पालघर) यांनी त्यांच्या नावावरील एकूण ९७८२.४४ चौ़मीटर बांधीव क्षेत्र असलेल्या साई पालखी निवाऱ्यातील दोन इमारती साईचरणी अर्पण केल्या. या इमारतींची सरकारी भावाप्रमाणे सुमारे ३२ कोटी २७ लक्ष १३ हजार रूपये किंमत आहे. या दानपत्रासाठीचे नोंदणी व मुद्रांक शुल्क १ कोटी ६३ लाख रूपये संस्थानने भरले. याशिवाय लवकरच कसारा घाटात पालखी थांबा उभारण्यासाठीही ३२ गुंठे जागा बाबांना अर्पण करणार असल्याचे तेंडोलकर यांनी सांगितले. संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे यांच्या हस्ते प्रथम हे दानपत्र समाधीवर ठेऊन नंतर संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.