ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून यंदा राज्याचा निकाल ८९.५६ टक्के लागला आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही १०वीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली असली तरी कमी गुण मिळाले म्हणून आत्महत्या केल्याच्या २ घटना महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या. सोलापूर आणि रत्नागिरी येथे मुलींनी कमी गुण मिळाले म्हणून स्वत:ला संपवले.
सोलापूर मधील मेहता शाळेत शिकणारी वेदवाणी कार्यमोल हिने आपल्याला फक्त ५१ टक्के गुण मिळाले म्हणून आपले जिवन संपवून टाकले तर रत्नागिरीमध्ये दापोली तालुक्यातील आपटी गावात केवळ ८० टक्के गुण मिळाले म्हणुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तिला ८५ टक्के गुण मिळायची आपेक्षा होती. राज्यातील एकूण निकालाच्या ९१.४१ टक्के मुली तर ८७.९८ टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत.