योगेश फरपट
खामगाव: केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेले जिल्हयातील २ तर राज्यातील २१ दूरदर्शन केंद्र ३१ मार्चपासून बंद करण्यात येणार आहे. यामध्ये चिखली, खामगाव या केंद्राचा समावेश आहे. या निर्णयाने राज्यातील २५० कर्मचाºयांना इतरत्र सेवेत रुजू केले जाणार असले तरी अद्याप प्लेसमेंटबाबत अनिश्चितता आहे. या निर्णयाने कर्मचारी धास्तावले आहेत.
बीएसएनएल कर्मचाºयांना स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय उपलब्ध करून देत अनेक ठिकाणचे बीएसएनल कार्यालयातील कर्मचारी कपात गत महिन्यात देशात सर्वत्र झाली. आता प्रसारभारतीकडे केंद्र सरकारने लक्ष वेधले आहे. प्रसारभारती अंतर्गत कार्यरत असलेले राज्यातील लघुप्रक्षेपण दूरदर्शन केंद्र बंद करण्याबाबत ३ मार्चरोजी संध्याकाळी इ-मेल धडकला. केंद्र नेमके का बंद होत आहेत. याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नव्हते. यामुळे कर्मचाºयांमध्ये नोकरी जाण्याची धास्ती वाढली आहे. प्रसारभारतीच्या मुख्य कार्यालयातून सर्व लघुप्रक्षेपण दूरदर्शन केंद्रांना पत्र पाठवण्यात आले आहे.
राज्यातील हे केंद्र होणार बंद भारत सरकारच्या नियंत्रणातील अकलूज, बदलापूर, चिखली, हिंगणघाड, खामगाव, खोपाली, किनवट, महाड, म्हसले, मोर्शी, पंढरपूर, परभणी, पुसद, संगमनेर, सांगली, सहाद, शिर्डी, शिरपूर, तुमसर, उमरेगा, उमरखेड ही दूरदर्शन केंद्र ३१ मार्चपासून बंद होणार आहेत.
चॅनल क्रमांक २१ दिसणार नाहीदूरदर्शन महानिदेशालय यांच्या आदेशानुसार खामगाव दूरदर्शन प्रक्षेपण केंद्रामार्फत प्रसारीत केल्या जाणाºया चॅनल क्रमांक २१ वरील कार्यक्रम यापुढे दिसू शकणार नाही. ३१ मार्च पासून ही सेवा खंडीत केली जाईल असे स्पष्ट केले आहे.