मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना घर बांधणीसाठी त्यांच्या वेतनश्रेणीनुसार २० ते ५० लाख रुपयांपर्यंत अग्रीम रक्कम देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कमीतकमी पाच वर्षे सेवा झालेल्या अथवा सेवानिवृत्तीसाठी किमान पाच वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असलेल्या कर्मचाऱ्यांना ही रक्कम मिळेल. या योजनेअंतर्गत घेण्यात येणारे घर हे अर्जदाराच्याच नावावर घेता येईल. तसेच पती, पत्नी दोघेही शासकीय कर्मचारी असले तरी यापैकी एकालाच याचा लाभ घेता येईल. त्याचबरोबर दोन पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारास या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अग्र्रिमची व्याजासह रक्कम सेवानिवृत्तीपूर्वी पूर्ण होईल अशा पध्दतीने मासिक हप्ता ठरविण्यात येईल.
घरबांधणीसाठी कर्मचा-यांना २० ते ५० लाख रु. अग्रीम
By admin | Published: February 24, 2015 4:37 AM