पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत ईव्हीएम मशिन घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत असताना याबाबतचे पुरावे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी निवडणूक आयुक्तांना दिले आहेत. ३२ प्रभागांपैकी १२ प्रभागांत एकूण मतांची संख्या समान आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील २० प्रभागांच्या चारही गटांच्या एकूण मतदानाच्या संख्येमध्ये तफावत आढळते, याबाबत निवडणूक आयोगाने खुलासा करावा, अशी मागणी होत आहे. कुंभार म्हणाले, ‘‘महापालिका निवडणुकीच्या आकडेवारीवरून असे लक्षात येते, की पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ३१ पैकी ११ एकूण मतांची संख्या समान आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील २० प्रभागांच्या चारही गटांच्या एकूण मतदानाच्या संख्येमध्ये तफावत आढळते आणि ही बाब गंभीर आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून यावर खुलासा होणे अत्यंत आवश्यक आहे. या निवडणूक प्रक्रियेत एका मतदाराने एका वेळी चार मते दिल्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होत नव्हती. याचा अर्थ एखाद्या प्रभागात समजा ९८७ नागरिकांनी मतदान केले, तर त्या प्रभागाच्या चारही गटातील एकूण मतांची संख्या प्रत्येक म्हणजे अ, ब, क आणि ड गटासाठी ९८७ इतकीच येणे आवश्यक आहे.’’ (प्रतिनिधी)>तफावत : निवडणूक प्रक्रियेचा फेरविचारप्रत्यक्षात मात्र अनेक प्रभागांत एकूण पडलेल्या मतांची संख्या अ, ब, क आणि ड या चारही विभागात वेगळी आहे. पिंपरीतील २० भागात अशी तफावत आढळून येते आणि ही बाब अत्यंत गंभीर आहे. ही बाब फक्त याच दोन महापालिकेत नव्हे, तर इतरही महापालिकांच्या बाबतीत घडली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही तफावत एका मतापासून ते पाचशे-सातशे मतांपर्यंत असल्याचे दिसून येते. ईव्हीएममधील उणीवेमुळे जर अशी तफावत आढळून येत असेल, तर एकूणच मतदान प्रक्रियेचा फेरविचार करावा लागेल. त्यामुळे या संदर्भात निवडणूक आयोगाने खुलासा करावा.भाजपाकडून गैरवापराचा राष्ट्रवादीचा आरोपपिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक नुकतीच झाली. निवडणुकीत ईव्हीएमचा गैरवापर केल्याचा आरोप केला जात आहे. महापालिकांच्या निवडणुकी संदर्भातील पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिकांच्या संकेतस्थळावरील आकडेवारी पाहणी कुंभार यांनी केली. आणि या संदर्भातील निरीक्षण नोंदविले आहे.
वीस प्रभागांतील मतदानात घोळ
By admin | Published: March 01, 2017 12:28 AM