अमरावती : शासकीय कर्मचाऱ्यांनी सेवेप्रती कायम बांधिलकी जपावी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविता यावा, यासाठी राज्य शासनाकडून २० लाख कर्मचाऱ्यांचे ‘प्रोफाईल’ तयार करण्यात येत आहे. यात काही विभागांनी कर्मचाऱ्यांचे प्रोफाईल तयार करण्यात आघाडी घेतली आहे.राज्य शासनाच्या ४३ विभागातील वर्ग १ ते ३ च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती एका क्लिकवर मिळावी, यासाठी प्रत्येकाचे ‘प्रोफाईल’ तयार केले जात आहे. कर्मचाऱ्यांची संपत्ती, आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचाराची तक्रार आदी बाबी राज्य शासन ‘प्रोफाईल’च्या माध्यमातून एका ‘क्लिक’वर पाहू शकेल. प्रत्येक विभागाच्या सचिवांवर अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ‘प्रोफाईल’ तयार करण्याची जबाबदारी प्रधान मुख्य सचिवांनी सोपविल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
राज्यातील २० लाख कर्मचाऱ्यांचे तयार होणार ‘प्रोफाईल’
By admin | Published: October 03, 2016 4:01 AM