ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - तेजतर्रार काळीभोर किंवा गर्द लाल रंगाची मिसळ म्हणजे खवय्यांचा जीव की प्राण.. मिसळ खायला लागणे हे महाराष्ट्रात तरी ब:याच ठिकाणी आपण तरुण झालो आणि आता स्वतंत्र झालो ह्याची अनाऊन्समेण्ट आहे. मिसळ खाणारा कोणत्याही वयाचा असो, तिची तिखटजाळ चव जेव्हा जीभ जाळते तेव्हा कोणत्याही वयात आपल्यातला रांगडेपणा अजून गेला नाही ह्याची सुखद जाणीव मनाला देत राहते. मिसळीला नुकताखवय्यांचा एक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही जाहीर झाला.
घराघरांत उसळीत फरसाण, कांदा घालून आणि ब्रेडबरोबर देता येण्याजोगा एक मिसळ वाटावा असा पदार्थ बनतोच. कौटुंबिक दडपणाखाली आपण तो खातोसुद्धा. पण त्याला हॉटेलात मिळणा-या मिसळीचा डौल नाही.
आज आपण पाहुया सर्वोत्तम मिसळ मिळणारी महाराष्ट्रातील काही निवडक ठिकाणे :
१) मामलेदार मिसळ, ठाणे
२) अण्णा बेडेकर, पुणे
३) मूनमून मिसळ, डो॑बिवली
४) कुंजविहार, ठाणे स्टेशन
५) मनशक्ती के॑द्र, लोणावळ
६) संजिवनी- माडिवाले कॉलनी, टिळक रोड
७) भगवानदास, नाशिक
८) प्रकाश, दादर
९) फडतरे मिसळ कोल्हापुर
१०) मामा काणे, दादर
११) गोखले उपहार गृह, ठाणे
१२) काटाकिर्र, गरवारे कॉलेज समोर, पुणे
१३) खासबागची मिसळ कोल्हापुर
१४) आस्वाद, दादर
१५) माधवराव, सातारा
१६) श्रीकृष्ण - तुळशीबाग, पुणे
१७) चोरगे मिसळ, कोल्हापूर
१८) सर्वोदय लंच होम, करीरोड पुलाखाली (डिलाइल रोडची बाजू)
१९) दत्तकृपा, वडखळ नाका
२०) जुन्नर मध्ये एक उंब्रज नावाचे छोटे गाव आहे. तिथे "दांगटांची मिसळ"