मुंबई : पावसाने कृपा केल्यामुळे गेल्या महिन्यात रद्द करण्यात आलेली पाणीकपात मुंबईकरांना पुन्हा आठ दिवस सहन करावी लागणार आहे़ गुंदवली ते कापूरबावडी बोगद्याचे काम हाती घेण्यात येत असल्याने सोमवारपासून संपूर्ण मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे़ अपुऱ्या पावसामुळे गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यापासून मुंबईत १५ टक्के पाणीकपात लागू होती़ मात्र या वर्षी चांगला पाऊस झाल्याने ही पाणीकपात गेल्या महिन्यातच मागे घेण्यात आली़ पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी पालिकेने बोगदा टाकण्याचे काम हाती घेतले आहे़ या अंतर्गत गुंदवली ते कापूरबावडी या जलबोगद्याचे काम सोमवारपासून सुरू होत आहे़ २२ आॅगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंत हे काम टप्प्याटप्प्याने होणार आहे़या कपातीची झळ वितरण व्यवस्थेच्या टोकाकडील दहिसर, कुलाबा यासारख्या परिसराला, डोंगराळ भागातील रहिवाशांना बसेल़ (प्रतिनिधी)
मुंबईत उद्यापासून आठ दिवस २०% पाणीकपात
By admin | Published: August 21, 2016 6:14 AM