आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६ : गेल्या वीस वर्षात शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणते निर्णय झाले याची सर्वांना माहितीच आहे़ आमचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत आहे़ एकाच दिवशी सर्व काही घडत नाही़ मात्र गेल्या २० वर्षात झालेली पापे धुवायला वेळ लागेल अशा शब्दात राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी राजकीय विरोधकांवर निशाणा साधत शेतकऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले़ राज्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे़ या पार्श्वभूमीवर कर्जमाफी आणि हमी भावाबाबत सरकार सकारात्मक आहे़ आतापर्यंत या सरकारने शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नावर लक्ष केंद्रीत केले होते़ शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका सकारात्मक आहे़ त्यावर चर्चाअंती लवकरच सर्वमान्य तोडगा निघेल मात्र शेतकऱ्यांनी सबुरीचे धोरण स्वीकारून आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन देशमुख यांनी केले़ विरोधक शेतकरी आंदोलनाला फूस लावण्याच काम करीत असल्याचाही आरोप देशमुख यांनी केला आहे. त्यांनी २० वर्षात शेतकऱ्यांसाठी काही केले असते तर ही वेळ आलीच नसती़ असे सुनावले़ राजकारणात अनेकांची दुकानदारी बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या आडून आंदोलनाला खतपाणी घालत असल्याचा आरोप सहकारमंत्र्यांनी केला़ मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव आहे. सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. कर्जमाफी आणि हमीभावाबाबत सरकार सकारात्मक आहे. चर्चसाठी सर्व शेतकरी संघटना आणि प्रतिनिधींसाठी सरकारची दारं खुली असून शेतकऱ्यांनी संप मागे घ्यावा, असं आवाहन देशमुख यांनी केलं. तसंच अल्पभूधारकांना दिलासा देण्यासाठी समिती स्थापन केल्याचंही सुभाष देशमुखांनी सांगितलं.दरम्यान, शेतकऱ्यांनी दुध व शेतीमालाची नासाडी न करता हे अन्न गोरगरिबांना वाटावं. वसतीगृहातील विद्यार्थ्यांना, अनाथांना द्यावं अशी सुचना केली़ शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रकरणी सरकार संवेदनशील आहे. भाजपचे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या दारात जाऊन संप मागे घेण्याचं आवाहन करणार असल्याचंही सहकारमंत्र्यांनी स्पष्ट केले़
२० वर्षाचे पाप धुवायला वेळ लागणार : सुभाष देशमुख
By admin | Published: June 06, 2017 6:38 PM