ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ६ - लवासासाठी अवैद्य पध्दतीने घेतलेली १३ आदिवासी शेतकऱ्यांची २०० एकर जमीन परत द्या असा आदेश पुणे उपविभागीय दंडाधिकाऱ्याने दिला आहे. त्यामुळे लवासाला झोरदार झटका बसला आहे.
लवासा प्रकल्प सुरु करताना बेकायदेशीरपणे तिथल्या स्थानिकांची जमीन लाटल्याचा आरोप होत होता. त्या पार्श्वभूमीवर काही शेतकऱ्यांना दंडाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. याप्रकरणात सुनावणी करताना लवासातील १३ शेतकऱ्यांची जमीन बेकायदेशीर पद्धतीनं घेतली. त्यामुळे ही २०० एकर जमीन परत करा असा आदेश पुणे उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
ही जमीन आदिवासी कुटुंबांची असून बेकायदेशीरपणे लवासाच्या मालकीची करण्यात आली होती. आता ही जमीन सरकारजमा करण्यात येईल आणि त्यानंतर आदिवासी कुटुंबांना परत करण्यात येईल. लवासावर पर्यावरणाच्या नियमांचे उलंघन केल्याचा आरोप आहे.