शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
2
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
3
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
4
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
5
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
6
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
7
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
8
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
9
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
10
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
11
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
12
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
13
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
14
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
15
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
16
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
17
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
18
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
19
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
20
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार

कारागृहात वस्तू पुरवठ्याचा २०० कोटींच्या ठेक्याचा वाद; एका विनंती पत्रावर दिला ठेका 

By विश्वास पाटील | Published: July 16, 2024 12:51 PM

कैद्यांनाही आर्थिक फटका बसण्याची भीती

विश्वास पाटीलकोल्हापूर : राज्यभरातील नऊ मध्यवर्ती कारागृहांसह एकूण ५२ कारागृहांतील कैद्यांसाठी असलेल्या कॅंटीनला मालपुरवठा करण्याचा सुमारे २०० कोटींचा ठेका भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघास (एनसीसीएफ) कारागृह प्रशासनाने नुसत्या एका विनंती पत्रावर दिला आहे. याविरोधात या कँटीनला मालपुरवठा करणारे राज्यभरातील शंभरांवर अधिक व्यापारी एकवटले आहेत. हा ठेका देण्यात काहींचे आर्थिक हितसंबंध गुंतलल्यानेच हा व्यवहार झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.कारागृहात कैद्यांना जे पैसे मिळतात किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून आलेल्या पैशांतून ते दैनंदिन लागणाऱ्या वस्तू या कॅंटीनमधून खरेदी करतात. या खर्चाची महिन्याला ५ हजारांपर्यंतची मर्यादा आहे. राज्य शासनानेच २०१५ च्या आदेशानुसार त्यासाठी लागणाऱ्या सुमारे ६०० विविध प्रकारच्या वस्तू कुणाकडून खरेदी कराव्यात, याची नियमावली निश्चित करून दिली आहे.त्यानुसार २०१८ पासून प्रत्येक कारागृह ऑनलाइन निविदा मागवून ही खरेदी करते, परंतु ते बंद करून अचानक यावर्षीपासून मालपुरवठ्याची जबाबदारी भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघास दिली. त्यांनी कारागृह प्रशासनाकडे तशी विनंती केली होती. छापील किमतीत ५ टक्के सवलत देतो, असे सांगितल्यावर अन्य कोणतीच प्रक्रिया न राबवता शासनाने या संघास हा ठेका दिला असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

वादाचे मुद्दे काय..

  • दूध, चिकन, भाजीपाला, अंडी अशा अनेक वस्तूंचे दर जिल्हानिहाय वेगवेगळे आहेत. एनसीसीएफ राज्य पातळीवर एकाच दराने वस्तूपुरवठा करणार असल्याने त्याचा आर्थिक फटका कैद्यांना बसणार आहे.
  • छापील किमतींपेक्षा स्पर्धात्मक दरात अनेक वस्तू सरासरी वीस ते चाळीस टक्क्यांपेक्षा स्वस्त मिळतात, मग ५ टक्क्यांचे आमिष कशासाठी?
  • एनसीसीएफने हवे असल्यास सर्व कारागृहांत निविदा भरून जरूर हा ठेका घ्यावा.

एक नुसते विनंती पत्र दिल्यावर कारागृह प्रशासनाने राज्यातील मालपुरवठ्याचा ठेका या संघास दिला आहे. त्यामागे कुणाचे आर्थिक हितसंबंध आहेत, याची चौकशी व्हायला हवी. - हेमंत सूर्यवंशी, कारागृह उपहारगृह पुरवठादार व्यापारी असोसिएशन राज्य 

ग्राहक संघाचे दर हे बाजारभावापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे कैद्यांना त्याचा आर्थिक फटका बसू शकतो. आमच्या मालपुरवठ्याबद्दल एकही तक्रार नसताना शासन छोट्या व्यापाऱ्यांच्या पोटावर का उठले आहे ? - मनोज खानविलकर, कारागृह उपहारगृह पुरवठादार व्यापारी असोसिएशन कोल्हापूर.

कांही वस्तूंच्या प्रतिकिलो दरातील तफावतवस्तू : एनसीसीएफ : व्यापारीचिकन - २५० : १९४मिक्स फरसान - १७५ : ९५.६०लसूण शेव - १८० : ११९.८०बटाटा वेफर्स - २१० : १९२बिसलरी बॉटल - १९ : १२.६०

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPrisonतुरुंग