शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही आता परजीवी काँग्रेस; ज्याच्यासोबत असते त्यालाच...", पंतप्रधान मोदींची लोकसभेत तुफान फटकेबाजी
2
भावना गवळी, कृपाल तुमानेंना विधानपरिषदेची उमेदवारी; शिंदे गटात नाराजी
3
हाथरस येथील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढला, रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठीही उरली नाही जागा   
4
"हिंदूंना विचार करावा लागेल, हा अपमान योगायोग की प्रयोग'; लोकसभेत काय म्हणाले PM मोदी?
5
"आजकल बच्चे का मन बहलाने का काम चल रहा है...", निवडणूक निकालावरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
"सलग तिसऱ्यांदा १०० च्या आत, तिसरा पराभव, तरीही काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टिम...", मोदींचा खोचक टोला
7
"बाबूजी म्हणजे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील खणखणीत नाणे", देवेंद्र फडणवीसांकडून स्व. जवाहरलाल दर्डांना अभिवादन
8
“जयंत पाटील तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
"मतदारांनी काँग्रेसलाही जनादेश दिला, तो विरोधी बाकावर बसण्याचा", PM मोदींची बोचरी टीका...
10
“तिसऱ्या टर्ममध्ये तिप्पट वेगाने काम, विकसित भारताचा संकल्प पूर्ण होणार”; PM मोदींची लोकसभेत गॅरंटी
11
"2014 पूर्वी देशात घोटाळ्याचा काळ होता...", लोकसभेतून PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
किंग खानच्या शिरपेचात मानाचा तुरा! 'या' इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुखचा होणार खास सन्मान
13
"अब की बार चोको बार", DMK खासदारानं भाजपच्या घोषणेची उडवली खिल्ली!
14
विश्वास वाढवणारा विश्वविजय! देशाने पाहिलेलं गोड स्वप्न साकार होतं तेव्हा...
15
काँग्रेसमधून निवडून आलेलो याचा मला गर्व, शंका नसावी; अशोक चव्हाणांचे राज्यसभेत वक्तव्य 
16
“मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहीण”; विधान परिषद उमेदवारीवर भावना गवळींची प्रतिक्रिया
17
"राहुल गांधींना 'अभय मुद्रे'संदर्भात ज्ञान नाही; मी त्यांना..."! रामभद्राचार्य स्पष्टच बोलले
18
“राहुल गांधींकडून हिंदू धर्माचा अपमान झाला नाही”; उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट, भाजपावर टीका
19
इस्लाममध्येही असते ‘अभय मुद्रा’? राहुल गांधींचा दावा अजमेरच्या चिश्तींनी फेटाळला, म्हणाले, तसा कुठलाही...
20
लफडे... अन् ब्लॅकमेल! तीन वर्षांपासून ज्या तरुणीने १० लाख वसूल केले, ती पत्नीच निघाली

राज्यात जेनरिक औषधांची २०० दुकाने सुरू होणार

By admin | Published: September 18, 2015 2:50 AM

राज्यात लवकरच जेनरिक औषधांची २०० पेक्षा अधिक दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे लाखो रुग्णांना स्वस्तात औषधे मिळू शकतील. केंद्रीय औषधे व रसायने राज्यमंत्री हंसराज अहीर

- यदु जोशी, मुंबई

राज्यात लवकरच जेनरिक औषधांची २०० पेक्षा अधिक दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे लाखो रुग्णांना स्वस्तात औषधे मिळू शकतील. केंद्रीय औषधे व रसायने राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली. पुढील महिन्यापासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. जेनरिक औषधांची दुकाने सुरू करण्याची योजना तत्कालिन यूपीए सरकारच्या काळात चार-पाच राज्यांमध्ये सुरू झाली होती, पण ती फारशी यशस्वी झाली नाही. आजमितीस त्यातील १८९ दुकाने सुरू आहेत. या दुकानांबाबत आधी राहिलेल्या उणिवा दूर करीत नव्याने ही योजना राबविली जाणार आहे. महाराष्ट्रात अशी दुकाने केंद्र सरकारच्या माध्यमातून पहिल्यांदाच सुरू होत आहेत. केंद्राच्या ब्युरो आॅफ फार्मा या सार्वजनिक उपक्रमाचे संचालक (आॅपरेशन्स) कुलदीप चोपडा यांनी गेल्या आठवड्यात वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळांमध्ये अशी दुकाने सुरू करण्यास तावडे यांनी सहमती दर्शविली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांबरोबरच जिल्हा सामान्य रुग्णालये आणि अन्य काही सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्येदेखील ही दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय, काही संस्थांनी आणि व्यक्तींनी ही दुकाने उघडण्याबाबत पुढाकार घेतला, तर त्यांना सहकार्य केले जाईल, असे हंसराज अहीर यांनी स्पष्ट केले. या दुकानांमुळे औषधे ५० ते ७० टक्के स्वस्त मिळू शकतील. महाराष्ट्रात ती सुरू करताना जवळपास ५०० प्रकारची औषधे त्यात उपलब्ध असणार आहेत. त्यात औषधांबरोबरच सर्जिकल उपकरणांचाही समावेश असेल. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही दुकाने महाराष्ट्रात सुरू करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. आता त्यासाठी राज्य शासनाचा वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहकार्य असेल, अशी भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे. जेनरिक औषधांचे खासगी दुकान मध्य भारतात पहिल्यांदा सुरू करणारे नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड.अनिल किल्लोर म्हणाले की हा निश्चितच मोठा निर्णय आहे पण याच दुकानांमध्ये खुल्या बाजारातील औषधांची विक्री करण्याची अनुमती सरकारने द्यायला हवी. तसे झाल्यास ही दुकाने व्यवहार्य ठरतील आणि सगळ्या प्रकारची औषधे रुग्णांसाठी मिळू शकतील.