पुणे, दि. 6 - अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने 200 तरुणांसोबत गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर टिळक रस्ता झाडून स्वच्छ केला. केवळ शब्दांतून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीमधून प्राजक्ताने आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान जागे असल्याचे दाखवून दिले.टेलअस फाऊंडेशनच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टिळक रस्त्यावरील अभिनव कला महाविद्यालयापासून या उपक्रमाला दुपारी एकच्या सुमारास सुरुवात करण्यात आली. साधारणपणे चार वाजण्याच्या सुमारास अलका टॉकीजपर्यंतचा रस्ता झाडून स्वच्छ करण्यात आला. हॅन्डग्लोज, झाडू घेऊन २०० तरुण-तरुणी रस्ता स्वच्छ करीत होते.या उपक्रमामध्ये निखिल लिमये, लोकेश बापट, जान्हवी बापट, किमया बापट, किरण देडगे, ऋतुराज पाटील यांच्यासह भारती विद्यापीठ महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह जाणीव जागृती संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे प्राजक्ता माळीच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम आकाऊंटवरील मित्रही या उपक्रमात सहभागी झाले होते.
प्राजक्ता माळीसह 200 तरुणांनी केला टिळक रस्ता स्वच्छ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2017 11:53 PM