शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

२०२३ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 8:16 PM

चेतन दळवी, निशिगंधा वाड यांना चित्रपट विभागातील पुरस्कार. सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा. 

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. दरम्यान, २०२३ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री   सुधीर मुनगंटीवार यांनी आज ही घोषणा केली. गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, राज्य सांस्कृतिक पुरस्कार इत्यादी पुरस्कार सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी देण्यात येतात.सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत पुरस्काराच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली असून राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. याशिवाय पुरस्कारांच्या क्षेत्रांमध्येही विस्तार करण्यात आला आहे.२०२३ चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेशजी वाडकर यांना जाहीर झालेला आहे. संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारास हा पुरस्कार देण्यात येतो. तर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार २०२२ साठी पं. उल्हासजी कशाळकर यांना, तर २०२३ च्या पुरस्कारासाठी पं. शशिकांतजी (नाना) श्रीधर मुळ्ये यांची घोषणा करण्यात आली आहे. शास्त्रीय संगीतासाठी ज्यांनी अतुलनीय योगदान दिले आणि शास्त्रीय संगीत क्षेत्राची सेवा केली, त्या कलाकारांच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार २०२२ साठी श्रीमती सुहासिनीजी देशपांडे यांच्या नावाची घोषणा झाली आहे, तर २०२३ साठी अशोकजी समेळ यांना पुरस्कार घोषित झाला आहे. मराठी रंगभूमीवर ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे, अशा कलाकारांना या पुरस्काराने गौरविण्यात येते.पुरस्कार विजेत्यांची नावं पुढीलप्रमाणेगान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारसुरेशजी वाडकर (२०२३)

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारसुहासिनी देशपांडे (२०२२)अशोक समेळ (२०२३)

संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कारनयना आपटे (२०२२)पं. मकरंदजी कुंडले (२०२३)

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कारपं. उल्हास कशाळकर (२०२२)पं. शशिकांत (नाना) श्रीधर मुळ्ये (२०२३)

राज्य सांस्कृतिक पुरस्कार

नाटकवंदनाजी गुप्ते (२०२२)ज्योती सुभाष (२०२३)

उपशास्त्रीय संगीतमोरेश्वर निस्ताने (२०२२)ऋषिकेश बोडस (२०२३)

कंठ संगीतअपर्णा मयेकर (२०२२)रघुनंदन पणशीकर (२०२३)

लोककलाहिरालाल रामचंद्र सहारे (२०२२) कीर्तनकार भाऊरावजी थुटे महाराज (२०२३)

शाहिरीजयंत अभंगा रणदिवे (२०२२)राजू राऊत (२०२३)

नृत्यलताजी सुरेंद्र (२०२२)सदानंदजी राणे (२०२३)

चित्रपटचेतन दळवी (२०२२)निशिगंधा वाड (२०२३)

कीर्तन प्रबोधनप्राची गडकरी (२०२२)अमृत महाराजजी जोशी (२०२२)

वाद्य संगीतपं. अनंतजी केमकर (2022)शशिकांत सुरेश भोसले (2023)

कलादानसंगीताजी राजेंद्र टेकाडे (२०२२)यशवंत रघुनाथ तेंडोलकर (२०२३)

तमाशाबुढ्ढणभाईजी बेपारी (वेल्हेकर) (२०२२)उमाजी खुडे (२०२३)

आदिवासी गिरीजनभिकल्या धाकल्या धिंडा (२०२२)सुरेश नाना रणसिंग (२०२३)

टॅग्स :Suresh Wadkarसुरेश वाडकर Lata Mangeshkarलता मंगेशकरMaharashtraमहाराष्ट्र