- सतीश डोंगरे, नाशिकअस्मानी संकट व दुष्काळाने हतबल होऊन पतीने मृत्यूला कवटाळल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी पेलणाऱ्या महिलेचा संघर्षदेखील अर्ध्यातच संपल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. गेल्या चार महिन्यांत राज्यातील तब्बल २०३ महिला शेतकऱ्यांनी पतीप्रमाणेच मृत्यूला कवटाळून जगाचा निरोप घेतला आहे.१ आॅक्टोबर २०१५ ते जानेवारी २०१६ या चार महिन्यांमध्ये अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये तीन हजार ११४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात अमरावती जिल्ह्यात १२४, औरंगाबाद ६७, तर नाशिकमध्ये १२ महिला शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.दुष्काळामुळे शेतीत पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने अन् सरकार दरबारी दखल घेतली जात नसल्याच्या निराशेतून महिला शेतकऱ्यांनीसुद्धा असहायतेतून पतीप्रमाणेच आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला.पतीच्या आत्महत्येनंतर मुलांचे शिक्षण, कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ, यांसह शेती पिकविण्याचे आव्हान महिलेसमोर असते. पावसाअभावी नापिकीचे मोठे संकट उभे ठाकल्याने महिला शेतकरीही हताश झाल्याचे चित्र आहे.
चार महिन्यांत २०३ महिला शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By admin | Published: April 03, 2016 3:51 AM