शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

विभागातील २०६३ विद्यार्थ्यांचे वर्ष वाचले ! ‘लोकमत’मुळे ५७ हजार विद्यार्थ्यांना आता अकरावी प्रवेश

By admin | Published: August 26, 2015 12:16 AM

दहावीची फेरपरीक्षा : कोल्हापूर विभागाचा २१.८० टक्के निकाल, राज्यात सातव्या स्थानी

कोल्हापूर : दहावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची आॅक्टोबर-मार्च वारी थांबावी. त्यांचे शैक्षणिक वर्ष वाचावे म्हणून शासनाने घेतलेल्या फेरपरीक्षेत कोल्हापूर विभागातील २०६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे त्यांना अकरावी प्रवेशाची संधी मिळाली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै-आॅगस्टमध्ये घेतलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता आॅनलाईन जाहीर केला. यात कोल्हापूर विभागाचा २१.८० टक्के निकाल आहे. यामध्ये विभाग राज्यात सातव्या स्थानी असल्याची माहिती कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व्ही. बी. पायमल व सचिव शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.विभागीय अध्यक्ष पायमल म्हणाले, दहावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाने फेरपरीक्षा घेतली. तिचा चांगला परिणाम झाला. २१ जुलै ते ५ आॅगस्टदरम्यान ३४ केंद्रांवर एकूण ९ हजार ४६३ विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षा दिली. दरम्यान, यांपैकी २ हजार ६३ विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून, त्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण २१.८० टक्के आहे. यात १ हजार ५१४ मुले उत्तीर्ण झाली असून त्यांचे प्रमाण २०.९४ टक्के, तर ५४९ मुली उत्तीर्ण झाल्या असून त्यांचे प्रमाण २४.५९ टक्के आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी मिळालेला कालावधी लक्षात घेता निकालाची टक्केवारी चांगली आहे.राज्यातील ज्या विभागांचे मार्चमध्ये झालेल्या परीक्षेत चांगले निकाल लागले होते, त्यांची टक्केवारी या निकालात कमी दिसत आहे.गोसावी म्हणाले, या फेरपरीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या १२ विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. यात कोल्हापूरमधील आठ व सांगलीतील चौघाजणांचा समावेश आहे. गुणपत्रिकांचे वाटप ३१ आॅगस्टला दुपारी तीन वाजता शाळांमध्ये होणार आहे. गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत १० सप्टेंबर आणि उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत १४ सप्टेंबरपर्यंत आहे. या पत्रकार परिषदेस शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी, मंडळाचे सहसचिव पी. डी. भंडारे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘लोकमत’मुळे ५७ हजार विद्यार्थ्यांना आता अकरावी प्रवेश दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेमुळे राज्यातील सुमारे ५७ हजार ५१७ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचले आहे. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळेच राज्य शासनाने दहावी व बारावीची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. कर्नाटकात गेली चौदा वर्षे दहावी, बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेतली जाते. महाराष्ट्रात मात्र ही परीक्षा आॅक्टोबरमध्ये घेतली जात होती. कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातही फेरपरीक्षा घेतली जावी यासाठी ‘लोकमत’ने कोल्हापूर आवृत्तीत तीन भागांची वृत्त मालिका प्रसिद्ध केली होती. कोल्हापुरात झालेल्या भाजपच्या राज्य अधिवेशनात शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निदर्शनास ही बाब आणून देऊन दहावी, १२ वीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाचविण्यासाठी निकालानंतर लगेच फेरपरीक्षा घेणे कसे गरजेचे आहे, हे त्यांना पटवून दिले होते. त्यावर याबाबत अभ्यास करून सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन तावडे यांनी दिले होते. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांत तावडे यांनी दहावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला. राज्य मंत्रिमंडळानेही तो मंजूर करून घेतला. या निर्णयानुसार राज्य शिक्षण मंडळाने जुलै-आॅगस्ट दरम्यान फेरपरीक्षा घेतली. तिचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. फेरपरीक्षेसाठी बसलेल्या राज्यातील एक लाख ३९ हजार ३२९ विद्यार्थ्यांपैकी ५७ हजार ५१७ विद्यार्थी ११ वी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.जिल्हानिहाय निकाल असाजिल्हा उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारीकोल्हापूर ७८७२३.४४सांगली७५१२४.८४सातारा ५२५१७.०३