ऑलाइन लोकमतमुंबई, दि. ७ : मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या यादीमध्ये नाव आलेल्या २१ हजार २०८ विद्यार्थ्यांनी गुरूवारपर्यंत महाविद्यालय प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत अकरावीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख १७ हजार ८२१ झाली आहे.याआदी अकरावी आॅनलाईन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी सोमवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात आली. त्यात ५९ हजार ५०७ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला होता. मात्र त्यांमधील केवळ २१ हजार २०८ विद्यार्थ्यांनी गुरूवारपर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांचे नाव कुठल्याही कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आले नसेल, त्यांनी पुढच्या गुणवत्ता यादीची वाट पाहावी, असे आवाहन शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी केले आहे..................बोर्डाचे नाव पहिली फेरी दुसरी फेरी एकूण प्रवेशएस.एस.सी ८८,२७६ १९,६२७ १,०७,९०३सी.बी.एस.ई ३,१६० ४८२ ३,६४२आय.सी.एस.ई ४,५६२ ९०२ ५,४६४आय.बी १ ० १आय.जी.सी.एस.ई २४९ ८९ ३३८एन.आय.ओ.एस १०१ ४४ १४५इतर २६४ ६४ ३२८एकूण ९६,६१३ २१,२०८ १,१७,८२१
२१ हजार २०८ विद्यार्थ्यांनी घेतला अकरावीसाठी प्रवेश
By admin | Published: July 07, 2016 9:23 PM