अकोला : जिल्ह्यातील पातूर येथील शेतकरी नामदेवराव अढाऊ यांनी एका एकरात तब्बल 21 टन कांद्याचे उत्पादन घेऊन विक्रम केला आहे. या विक्रमी कांदा उत्पादनातून त्यांना 2.5क् लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर)ने याची दखल घेतली असून, अढाऊ यांची यशोगाथा आयसीएआरच्या संकेतस्थळावर मुख्य पृष्ठावर प्रकाशित झाली आहे.
अढाऊ हे आतार्पयत पारंपरिक पद्धतीने 1.25 एकर क्षेत्रवर कांद्याची लागवड करीत होते; मात्र अपेक्षेएवढे उत्पन्न होत नसल्यामुळे, त्यांनी हैदराबादस्थित कांदा व अद्रक संशोधन केंद्राने संशोधन केलेल्या, ‘भीमा शुभ्र’ या पांढ:या कांद्याच्या वाणाची लागवड केली. हैदराबादस्थित संशोधन केंद्राने या वाणाची खरीप व उशिराने सुरू झालेल्या खरीप हंगामासाठी शिफारस केली आहे. अढाऊ यांनी ‘भीमा शुभ्र’ वाणाच्या पाच किलो बियाण्याची 1.25 एकरावर लागवड केली होती. त्यांना तेवढय़ा क्षेत्रतून तब्बल 21 टन कांद्याचे उत्पादन मिळाले असून, त्यापासून त्यांना 2.5क् लाखांचा निव्वळ नफा झाला आहे. या कांद्याचा आकार अगदी एकसारखा आहे, हे येथे उल्लेखनीय आहे. अढाऊ यांनी या वाणाची महती परिसरातील 3क्क् शेतक:यांना समजावून सांगितल्यानंतर, तब्बल 75क् एकरांवर या वाणाची पेरणी झाली. अढाऊ यांच्यापासून प्रेरणा घेतलेल्या शेतक:यांना प्रति एकर एक लाख रुपयांपेक्षा अधिक नफा मिळाला आहे.
अढाऊ यांना तिथे स्व. वसंतराव नाईक गौरव पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आले होते. आपल्या प्रगतीचे श्रेय अढाऊ यांनी हैदराबाद येथील संशोधक व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागाला दिले आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडूनही प्रशंसा
4अढाऊ यांनी नागपूर येथील वसंत कृषी प्रदर्शनात हा कांदा मांडला होता. त्यांच्या ‘स्टॉल’ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भेट दिली होती आणि कांद्याची गुणवत्ता बघून प्रशंसा केली होती. या वाणास त्यांनी ‘कांद्याचा राजा’ असे संबोधित केले होते.