रहिम दलाल - रत्नागिरी -सर्वशिक्षा अभियानातून वर्गखोल्या बांधण्यासाठी देण्यात येणारे कोट्यवधी रुपयांचे अनुदान बंद करण्यात आले आहे. सर्वशिक्षा अभियानाच्या अनुदानामध्ये मोठी घट झाली असून, सन २०१४-१५ सालचा २३ कोटी ७४ लाख रुपयांचा वार्षिक आराखडा केंद्र शासनाने जिल्ह्यासाठी मंजूर केला आहे. आर्थिक वर्ष संपत आले असून, केवळ ९ कोटी ८४ लाख ९७ हजार रुपये जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहेत़ दरवर्षी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून केंद्र शासनाकडे सर्व शिक्षा अभियानाचा ५० कोटी रुपयांपर्यंतचा वार्षिक आराखडा सादर करण्यात येत होता. त्यामध्ये वर्गखोल्यांसाठी कोट्यवधी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात येत होते. मात्र, आता हा वार्षिक आराखडा निम्म्यावर आला आहे.सर्वशिक्षा अभियानातून चालू आर्थिक वर्षात २३ कोटी ७४ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यातील शाळाबाह्य मुलांसाठी २ कोटी १० लाख रुपये, मोफत पाठ्यपुस्तकांसाठी ३ कोटी ५२ लाख ६२ हजार रुपये, युनिफॉर्मसाठी ३ कोटी १५ लाख ११ हजार रुपये, शिक्षक वेतन २ कोटी २५ लाख ७२ हजार रुपये, शिक्षक प्रशिक्षण ४२ लाख ८५ हजार रुपये, गटसाधन केंद्र २ कोटी १६ लाख १८ हजार रुपये, समूह साधन केंद्र ५५ लाख २२ हजार रुपये, शाळा अनुदान २ कोटी २३ लाख ७८ हजार रुपये, देखभाल दुरुस्ती २ कोटी ६४ लाख ५० हजार रुपये, अपंग शिक्षण १ कोटी ६१ लाख ३२ हजार रुपये, शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षण १ कोटी २२ लाख ५७ हजार रुपये, संशोधन मूल्यमापन १ लाख ७१ हजार रुपये, व्यवस्थापनावर ८० लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये सन २०१३-१४ सालच्या उर्वरित ३ कोटी १० लाख २१ हजार रुपयांचाही समावेश आहे. सर्वशिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांच्या मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांचे नवीन बांधकाम करण्यात येत होते. आताही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांसाठी २१६ नवीन वर्गखोल्यांची आवश्यकता आहे़ या अनुदानातून दरवर्षी सुमारे १०० ते १५० वर्गखोल्यांची कामे घेण्यात येत होती. मात्र, आता या अनुदानातून वर्गखोल्यांची कामे घेणे बंद करण्यात आले आहे. यंदाचा सर्वशिक्षा अभियानाचा वार्षिक आराखडा कमी झाला आहे. आता वर्गखोल्या नवीन बांधायच्या झाल्यास त्यासाठी जिल्हा वार्षिक योजना किंवा सेसफंडातून निधी खर्च करावा लागणार आहे़ मात्र, या दोन्हीमधून जिल्हा परिषदेला पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने या नवीन वर्गखोल्यांची बांधणे पुढील १० वर्षात तरी शक्य नाही़ त्यामुळे नवीन वर्गखोल्या केवळ कागदावरच राहणार आहेत़ सर्वशिक्षाचा आराखडा २३ कोटी ७४ लाख रुपयांचा असला तरी चालू आर्थिक वर्षाचे ९ महिने उलटले आहेत़ आता केवळ तीन महिने बाकी आहेत़ या आर्थिक वर्षात एकूण आराखड्यापैकी निम्मेही अनुदान जिल्हा परिषदेला सर्वशिक्षामधून प्राप्त झालेले नाही़ केवळ ९ कोटी ८४ लाख ९७ हजार रुपये एवढे अनुदान मिळाले आहे़ त्यापैकी ८ कोटी ९४ लाख २३ हजार रुपये तालुक्यांना वितरित करण्यात आले आहे़ त्यामुळे उर्वरित अनुदान वेळीच न मिळाल्यास सर्वशिक्षा अभियान राबविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे़ २३ कोटी ७४ लाख रुपयांचा मंजूर वार्षिक आराखडाशाळाबाह्य मुलांसाठी२ कोटी १० लाख रुपयेमोफत पाठ्यपुस्तकांसाठी३ कोटी ५२ लाख ६२ हजार रुपयेयुनिफॉर्मसाठी३ कोटी १५ लाख ११ हजार रुपयेशिक्षक वेतन२ कोटी २५ लाख ७२ हजार रुपयेशिक्षक प्रशिक्षण४२ लाख ८५ हजार रुपयेगटसाधन केंद्र२ कोटी १६ लाख १८ हजार रुपयेसमूह साधन केंद्र५५ लाख २२ हजार रुपयेशाळा अनुदान२ कोटी २३ लाख ७८ हजार रुपयेदेखभाल दुरुस्ती२ कोटी ६४ लाख ५० हजार रुपयेअपंग शिक्षण१ कोटी ६१ लाख ३२ हजार रुपयेशाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षण१ कोटी २२ लाख ५७ हजार रुपयेसंशोधन मूल्यमापन१ लाख ७१ हजार रुपयेव्यवस्थापन८० लाख रुपयेतालुकानिहाय वर्गखोल्यातालुकाआवश्यक वर्गखोल्यामंडणगड१७दापोली३२खेड१६चिपळूण१५गुहागर३१संगमेश्वर१९रत्नागिरी२७लांजा२५राजापूर३४एकूण२१६
२१६ वर्गखोल्या कागदावरच!
By admin | Published: January 06, 2015 9:47 PM