शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

राज्यात दिवसभरात आढळले कोरोनाचे २१,९०७ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 6:28 AM

४२५ मृत्यू; साडे आठ लाखांहून अधिक रुग्ण झाले बरे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात दिवसभरात कोरोनाच्या २१ हजार ९०७ रुग्णांची नोंद तर ४२५ मृत्यू झाले. परिणामी, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११ लाख ८८ हजार १५ झाली असून, बळींची संख्या ३२ हजार २१६ झाली आहे.

राज्यात सध्या २ लाख ९७ हजार ४८० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.२२ टक्के असून, मृत्युदर २.७१ टक्के आहे. शनिवारी दिवसभरात नोंदविण्यात आलेल्या ४२५ मृत्युंपैकी २५५ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर १२२ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४८ मृत्यू हे एक आठवड्याभरापूर्वीचे आहेत.

राज्यात दिवसभरात २३,५०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर राज्यात आतापर्यंत ८ लाख ५७ हजार ९३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. दिवसभरातील ४२५ मृत्युंपैकी मुंबई ५०, ठाणे १७, ठाणे मनपा १, नवी मुंबई मनपा ८, कल्याण डोंबिवली मनपा १, उल्हासनगर मनपा १, भिवंडी-निजामपूर मनपा १, मीरा-भार्इंदर मनपा ८, पालघर ३, वसई विरार मनपा ७, रायगड १५, पनवेल मनपा १, नाशिक १, नाशिक मनपा ६, मालेगाव मनपा १, अहमदनगर ८, अहमदनगर मनपा ३, धुळे मनपा १, जळगाव ७, जळगाव मनपा २, नंदूरबार २, पुणे १२, पुणे मनपा ३९, पिंपरी-चिंचवड मनपा ४, सोलापूर १६, सातारा २६, कोल्हापूर २०, कोल्हापूर मनपा ५, सांगली १७, सांगली-मिरज- कुपवाड मनपा ९, सिंधुदुर्ग ३, रत्नागिरी ४, औरंगाबाद ७, औरंगाबाद मनपा ७, नागपूर १४, नागपूर मनपा २२, वर्धा ३ आदी रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान राज्याचे माजी अर्थमंत्री तथा बल्लारपूरचे (चंद्रपूर) आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. याबाबत मुनगंटीवार यांनी फेसबूक व टिष्ट्वटरवर याची माहिती दिली असून प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे.मुंबईत ३०,६३९ सक्रिय रुग्णमुंबईत शनिवारी कोरोनाचे २ हजार २११ रुग्ण आढळून आले, तर ५० मृत्यू झाले. शहर, उपनगरात कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ८२ हजार २०३ वर पोहोचली असून, एकूण मृत्यू ८ हजार ४२५ झाले. आतापर्यंत १ लाख ४२ हजार ७६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, ३० हजार ६३९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ७८.४ टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ५६ दिवस आहे.मुंबईत कोरोना संसर्ग वाढू लागल्याने प्रशासन, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. प्रत्येक गल्लीत, भाजी मार्केटमध्येही तपासणी, जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. माहीम कापड बाजार येथील हे दृश्य.