शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
2
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
3
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
5
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
6
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
7
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
8
‘भाई विरुद्ध ताई’ युद्धात भाजपच अस्तित्वहीन! बेलापूर मतदारसंघात वेगळाच पेचप्रसंग
9
ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज
10
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
11
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
12
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
13
शेकापची मोठी खेळी, सहा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केली नावे
14
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
15
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
16
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
18
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
19
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
20
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!

‘तो’ अमली पदार्थ २२ कोटींचा!

By admin | Published: March 10, 2015 11:05 PM

धर्मराजला कोठडी : जिल्ह्यात प्रथमच ११३ किलो ‘एमडीएम’ सापडल्याने पोलीस ‘अलर्ट’

खंडाळा/सातारा : खंडाळा तालुक्यातील कण्हेरी गावात सोमवारी ताब्यात घेण्यात आलेल्या अमली पदार्थांच्या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल २२ कोटी ४० लाख ९१ हजार रुपये असल्याची माहिती पुढे आली आहे. ‘मेथॅड्रॉन’ असे मूळ नाव असलेला हा अमली पदार्थ नशाबाजांमध्ये ‘एमडीएम’ नावाने परिचित आहे. कण्हेरी येथे पकडलेल्या साठ्याचे वजन ११३ किलो भरले आहे. दरम्यान, हा साठा ज्याच्या घरात सापडला, त्या धर्मराज बाहुराव काळोखे या मुंबईच्या हवालदाराला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.मुंबईसारख्या महानगरांमध्ये ‘एमडीएम’ या नावाने तरुणवर्गात ओळखला जाणारा अमली पदार्थ सातारा जिल्ह्यात प्रथमच सापडल्याने पोलिसांची झोप उडाली आहे. मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यानेच हा साठा बाळगल्याचे समोर आल्याने अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत. यामागे मोठी टोळी सक्रिय आहे का? पोलीस हवालदार धर्मराज बाबूराव काळोखे (वय ५२) याचे नशेचा व्यापार करणाऱ्या साखळीतील नेमके स्थान कोणते? जिल्ह्यात ‘एमडीएम’ची छुपी विक्री सुरू झाली आहे का? असल्यास या साखळीतील अन्य दुवे कोणते? अशा अनेक प्रश्नांभोवती तपासयंत्रणा फिरते आहे. धर्मराज काळोखेचे मूळ गाव कण्हेरी असून, त्याने आपल्या शेजाऱ्याच्या घरी पाच बॅगा ठेवण्यासाठी दिल्या होत्या. त्यासाठी त्याने संबंधिताला कपाट खरेदी करण्यासाठी काही पैसे दिले होते, असेही उघड होत आहे. त्याचे मुंबईत तीन घरे आहेत. त्याच्याकडे ‘एमडीएम’चा एकंदर ३०० किलो साठा असावा, अशी प्राथमिक माहिती होती. ती खरी असल्यास उर्वरित साठ्याचे त्याने काय केले, हेही शोधावे लागणार आहे. स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाची गुंतागुंत शोधून प्रत्येक धागा तपासण्याच्या मागे लागली आहे. सोमवारी काळोखे घरी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. त्याने मुंबईहून आणलेल्या पाच बॅगा शेजाऱ्याकडे ठेवण्यास दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्या ताब्यात घेण्यात आल्या होत्या. काळोखे हा मुंबईच्या मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याच्या गोपनीय शाखेत हवालदार म्हणून कार्यरत आहे. अंमली पदार्थांच्या तस्करांशी त्याचा संबंध कसा आला आणि ही साखळी कुठून निघून कुठपर्यंत पोचली आहे, याचा छडा लावण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक दीपक हुंबरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक पद्माकर घनवट, निरीक्षक अशोक शेवाळे याप्रकरणी दिवसभर कसून तपास करीत होते.काळोखे दहा दिवसांच्या रजेवरहवालदार काळोखे दहा दिवसांच्या रजेवर होता आणि या काळात तो कोकण, गोवा, महाबळेश्वर, आदी ठिकाणी फिरत होता, असे तपासात पुढे आले आहे. तो या सर्व ठिकाणी केवळ फिरण्यासाठी गेला होता की अमली पदार्थांशी संबंधित ही भटकंती होती, याचा शोध पोलीस घेत आहेत.काय आहे ‘एमडीएम’मूळ नाव ‘मेथॅड्रॉन’- साखरेसारखे पारदर्शक स्फटिक अंमली पदार्थांमध्ये समावेश करण्याची अधिसूचना फेब्रुवारीत जारी बाळगण्यास, सेवन करण्यास सोपा असल्याने महानगरांमधील तरुणांमध्ये नशेसाठी सर्वाधिक वापर जिभेवर ठेवताच जीभ चरचरते शीतपेयात मिसळून सहजपणे सेवन करता येणारा घातक अमली पदार्थइस्लामपुरात २० कोटींचे अंमली मेफेड्रॉम हस्तगत / वृत्त ५