शहरं
Join us  
Trending Stories
1
नवाब मलिक सोबत आहेत की नाही याचा खुलासा फडणवीसांनी करावा; वडेट्टीवारांना वेगळा संशय
2
Nawab Malik फडणवीसांच्या विरोधानंतरही अजित पवारांच्या बैठकीला नवाब मलिक हजर; महायुतीत वाद उफाळणार?
3
Hathras Stampede : ज्या मातीसाठी हाथरसमध्ये झाली चेंगराचेंगरी, त्यात काय होतं? समोर आली मोठी माहिती
4
ऋषी सुनक की केयर स्टार्मर, पुढील पंतप्रधान कोण? ब्रिटनमध्ये उद्या निवडणूक 
5
अजित पवारांच्या बैठकीत नवाब मलिकांची हजेरी, भाजपा नेत्यांची आली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "आमची तीव्र..."
6
Vraj Iron and Steel Share : शेअर बाजारात एन्ट्री घेताच लागलं अपर सर्किट, आयर्न कंपनीच्या शेअरचं जबरदस्त लिस्टिंग
7
'अश्वत्थामा'च्या भूमिकेत असा झाला अमिताभ बच्चन यांचा कायापालट, पाहा हे खास फोटो
8
Hathras Stampede : "मी सत्संगला जाण्यापासून रोखलं पण..."; चेंगराचेंगरीत कुटुंब उद्ध्वस्त, काळजात चर्र करणारी घटना
9
Kakuda Trailer: 'मुंज्या' फेम दिग्दर्शकाचा हॉरर कॉमेडी 'ककुडा', रितेश देशमुख-सोनाक्षी सिन्हा झळकणार
10
"मी रॅपिडो कधीच बुक करणार नाही"; अपघातानंतर ड्रायव्हर पळाला, तरुणीने सांगितली आपबीती
11
Hathras Stampede : हाथरसचं सत्संग मैदान बनलं 'स्मशानभूमी'; चेंगराचेंगरीतील ११६ जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
12
बसचा ब्रेक अचानक झाला फेल; जवानांनी वाचवला ४० प्रवाशांचा जीव, १० जण जखमी
13
५६व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा होणार अरबाज खान? शूरा खानसह मॅटर्निटी हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, चर्चांना उधाण
14
दिशा पटानी १२ वर्षे मोठ्या प्रभासला करतेय डेट? हातावरील टॅटूमुळे अफेयरच्या चर्चेला उधाण
15
"मैत्रीचं, प्रेमाचं धुकं भरून टाकतं आभाळ का मग....", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
16
हाथरस सत्संग घटनेत १२१ भाविकांचा मृत्यू; पोलिसांच्या FIR मध्ये प्रवचन देणाऱ्या 'भोले बाबा'चे नावच नाही
17
Share Market Opening : सेन्सेक्सनं रचला इतिहास, पहिल्यांदाच ८०००० पार, निफ्टीही ऑल टाईम हायवर
18
Zomato ची मोठी घोषणा, फूड डिलिव्हरी कंपनी नाही करणार 'हा' व्यवसाय; मागे घेतला निर्णय
19
ललित मोदीची मुलगी आलिया व्यवसायात आजमावतेय नशिब; माहितीये कोणत्या कंपनीची आहे मालकीण?
20
"माझ्या घरी कुणीच तुमची सेवा करत नव्हतं तरीही.."; केदार शिंदेंनी शेअर केला अनुभव

२२००० वर्षांपूर्वीचे मिळाले अलंकृत शिलाश्रय

By admin | Published: August 10, 2014 1:31 AM

मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतातील गाविलगडच्या टेकड्यांमध्ये आदिमानवांनी केलेले तब्बल २२६ अलंकृत ‘शिलाश्रय’ (नैसर्गिक गुफा) आढळून आले आहेत. हे शिलाश्रय २२००० वर्षे पूर्वीचे असावे, असा अंदाज आहे.

सातपुडा पर्वतात दडले होते सौंदर्य : २२६ वर कोरीव रेखाचित्रणसुमेध वाघमारे - नागपूरमध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतातील गाविलगडच्या टेकड्यांमध्ये आदिमानवांनी केलेले तब्बल २२६ अलंकृत ‘शिलाश्रय’ (नैसर्गिक गुफा) आढळून आले आहेत. हे शिलाश्रय २२००० वर्षे पूर्वीचे असावे, असा अंदाज आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण उत्खनन शाखा-१ व प्रागैतिहासिक शाखा, नागपूर यांच्यावतीने केलेले हे सर्वेक्षण अलिकडच्या काळातील सर्वात मोठे सर्वेक्षण असल्याचे बोलले जात आहे. बैतूल जिल्ह्यामधील आठनेर आणि मुलताई तहसील येथील टेकड्यांमध्ये प्राचीन उत्किर्ण चित्रे आणि रंगचित्रे आढळून आली आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण उत्खनन शाखा-१ नागपूरचे सहायक पुरातत्वविद् डॉ. प्रशांत सोनोने यांनी सांगितले, २०११ ते २०१४ मध्ये हे सर्वेक्षण झाले. आमच्या चमूंना २२६ अलंकृत शिलाश्रय आढळून आले. या अलंकृत शिलाश्रयांना कुकडसादेव, अंबादेवी, तेलकन, पाट, कौसुंब गुफा, मुंगसादेव, उगम, कुंड, मेंढागड, तकिरा, गायमुख, भोरकप, आग्याडोह, घोडपेंड, सालबर्डी, पचउमरी, पचमऊ, रामगड, झुनकारी, घोडम्मा आणि लामगोंदी अशा २१ समूहांत विभागले आहे. ही नावे जवळपास गावांच्या नावावरून आणि मंदिरांच्या नावावरून ठेवण्यात आली आहेत. यात प्रामुख्याने लाल रंगाच्या विविध छटा, हिरवा काळा आणि पांढऱ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय धारदार दगडाच्या मदतीने नैसर्गिक गुहांच्या समतल पृष्ठभागांवर कोरीव रेखाचित्रण केले आहे. प्राण्यांच्या समूहापासून ते भूमितीय आकृत्यापचमऊ विभागातील कुकडसादेव शिलाश्रयात बैलांच्या समूहाचे रेखाचित्रण आढळून आले. सालबर्डी येथे हरणांची शिकार करणारा घोडेस्वार, यासोबतच जंगल, युद्धाचे दृश्यही येथे कोरलेले आहे. अंबादेवी विभागातील आग्याडोह शिलाश्रयात नृत्याचे दृश्य, गायमुख शिलाश्रयात शंखलिपीतील अभिलेख आढळून आले आहेत. कुंड, अंबादेवी आणि सालबर्डी शिलाश्रयात हाताच्या पंजाची छाप, गायमुख आणि १० पायांचा ठसा प्राप्त झाला आहे. सालबर्डी, तेलकन, तकिरा, पाट, पचउमरी व अंबादेवी शिलाश्रयात स्त्रिया कोरलेल्या आहेत. कुकडसादेव शिलाश्रयात मधमाशांचे पोळ, तकिरा शिलाश्रयात मत्स्यजाळ, पक्ष्यामंध्ये मोर, बगळा, घोडेस्वारमध्ये गायमुख, घोडपेंड, झुनकारी, कुंड, घोडम्मा आणि भोरकप आढळून आले आहेत. भूमितीय आकृत्यांमध्ये चौकोन, गोलाकार आणि चाक प्राप्त झाले आहेत. मानवी आकृत्यांमध्ये एकटा माणूस व समूह दाखविला आहे. वृक्ष व फणसाच्या झाडाचे चित्रण आणि विशेष म्हणजे, हरणाच्या पोटातील आतडेही यात रेखाटले आहे.