शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

वाशीममध्ये २२५ एकर जमीन सिंचनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2016 5:32 PM

शासनाच्या अंतिम मंजुरीच्या फेऱ्यात अडकल्याने जिल्ह्यातील ७ सिंचन प्रकल्प निर्मितीला अनिश्चित ब्रेक लागला आहे.

सुनील काकडे/ऑनलाइन लोकमत

वाशिम- प्रारंभी एफआरए प्रमाणपत्र आणि आता शासनाच्या अंतिम मंजुरीच्या फेऱ्यात अडकल्याने जिल्ह्यातील ७ सिंचन प्रकल्प निर्मितीला अनिश्चित ब्रेक लागला आहे. तथापि, गेल्या ७ वर्षांपासूनचे हे भिजत घोंगडे अद्याप कायम असल्याने तब्बल २२५ एकर जमिन सिंचनापासून वंचित राहत आहे. वनजमिनीवर सिंचन प्रकल्प उभारावयाचा असेल तर सर्वप्रथम वनविभागाचे त्यास फॉरेस्ट राईट अ‍ॅक्ट (एफआरए) अन्वये नाहरकत प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. त्यानुसार, जलसंपदा विभागाने वनविभागाच्या मुख्य कार्यालयाकडे सातही प्रकल्पांना एफआरए प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भात सलग पत्रव्यवहार केला. मात्र, त्याचा विशेष फायदा झाला नाही. दरम्यान, लोकमतने शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नाकडे लक्ष पुरवून यासंदर्भात सन २०१५ मध्ये विविधांगी वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेवून राज्यशासनाने आॅक्टोबर २०१५ ते एप्रिल २०१६ या कालावधीत सातही प्रकल्पांना एफआरए प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली. ९ मार्च २००९ मध्ये मंजूर जयपूर लघूप्रकल्पास २ एप्रिल २०१६ मध्ये एफआरए प्रमाणपत्र मिळाले. मात्र, ६१ एकर सिंचन क्षमतेच्या या प्रकल्पाचे काम त्यानंतर पुढे सरकू शकले नाही. १५ फेब्रूवारी २०१० मध्ये मंजूर शेलगांव संग्राहक आणि फाळेगांव संग्राहक प्रकल्पाला आॅक्टोबर २०१५ मध्ये ह्यएफआरएह्ण प्रमाणपत्र मिळाले; पण यामध्ये उद्भवलेल्या त्रुट्यांमुळे ३३ एकर सिंचन क्षमता निर्मितीच्या या दोन्ही प्रकल्पांची कामे रेंगाळली आहेत. १८ जून २०१० मध्ये मंजूर पारवाकोहर संग्राहक प्रकल्पास २९ फेब्रुवारी २०१६ मध्ये एफआरए प्रमाणपत्र देण्यात आले. परंतु ५२ एकर सिंचन क्षमता निर्माण होणाऱ्या या प्रकल्पास अद्याप हिरवी झेंडी मिळालेली नाही. यासह १३ आॅक्टोबर २०१० मध्ये मंजूर रापेरी संग्राहक प्रकल्पाला १७ मार्च २०१६ मध्ये एफआरए प्रमाणपत्र प्राप्त झाले, ५ नोव्हेंबर २०१२ मध्ये मंजूर पांग्राबंदी लघूप्रकल्पास ५ मार्च २०१६ मध्ये हे प्रमाणपत्र मिळूनही या प्रकल्पांची कामे पुढे सरकलेली नाहीत. परिणामी, तब्बल २२५ एकर जमीन सिंचनापासून वंचित राहत असून आत्महत्याग्रस्त वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये भर पडत असल्याचे दिसून येत आहे.