हजारो कॅमेरे, हत्यारांची खरेदी होणार : महासंचालकांकडून ई टेंडरिंगची प्रक्रिया
जमीर काझी - मुंबई
नाशिकमध्ये पुढच्या वर्षी होणारा कुंभमेळा सुरळीतपणो पार पडण्यासाठी तब्बल 23क्क् कोटींची साधनसामग्री व सुरक्षिततेच्या उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. राज्य सरकारला केंद्राकडून त्यासाठीचा विशेष निधी विविध टप्प्यांत उपलब्ध होत
असून, पोलीस महासंचालकांनी सामग्रीच्या खरेदी प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. ई टेंडरिंगद्वारे आवश्यक साधने तातडीने विकत घेतली जाणार आहेत.
दर 12 वर्षानी होणा:या कुंभमेळ्याला मार्च महिन्यापासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी जगभरातून लाखो साधू-संत व भाविकांची गर्दी होणार आहे. कोणतीही अनुचित घटना न घडता हा धार्मिक सोहळा सुरळीतपणो पार पडावा, यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था राबविण्यात येणार असून, हजारावर सीसीटीव्ही (क्लोज सर्किट टीव्ही) कॅमे:यांसह, हत्यारे व अन्य साधनसामग्री खरेदी केली जात आहे. ई टेंडरिंगद्वारे ही सर्व प्रक्रिया 6 महिन्यांत पूर्ण केली जाणार असल्याचे गृह विभागातील सूत्रंकडून सांगण्यात आले.
कुंभमेळ्यासाठी विविध संप्रदायातील येणारे साधू, भाविकांची होणारी गर्दी याबरोबरच मेळ्यात सहभागी होणारे व्हीव्हीआयपी राजकारणी यामुळे या ठिकाणी दहशतवाद्यांकडून घातपाती कृत्ये केली जाण्याची शक्यता आहे. ही बाब
लक्षात घेऊन त्याला प्रतिबंधात्मक सुरक्षा यंत्रणा उभारण्यासाठी पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी यापूर्वी वरिष्ठ अधिका:यांची बैठक घेऊन उपाययोजनांचे नियोजन केले आहे. या कामासाठी केंद्राकडून विशेष निधी मिळणार असल्याने सुरक्षा व्यवस्थेमध्ये जराही हलगर्जीपणा केला जाणार नाही. नियोजनानुसार साधनसामग्री खरेदी करण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे. ऑनलाइन निविदा जाहीर करून साधनांची खरेदी केली जाईल, सुरक्षिततेच्या
दृष्टीने अद्ययावत व गुणवत्तापूर्ण उत्पादने घेतली जाणार असल्याचे पोलीस महासंचालक कार्यालयातील वरिष्ठ अधिका:यांकडून सांगण्यात आले.
शाहीस्नानासाठी स्वतंत्र वेळ न दिल्यास आंदोलन
च्अलाहाबाद येथील कुंभमेळ्यानंतर अस्तित्वात आलेल्या महिला साध्वींच्या आखाडय़ाला येथील कुंभमेळ्यात तीन आखाडय़ांसोबतच पर्वणीच्या दिवशी शाहीस्नानासाठी स्वतंत्र वेळ व जागा हवी असून, गुरुवारी अलाहाबाद येथील गायत्री त्रिवेणी तीर्थ पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य श्री त्रिकाल भवन्ताजी महाराज या साध्वी आखाडय़ांच्या प्रमुखांनी कुंभमेळा अधिका:यांची भेट घेऊन तशी मागणी नोंदविली. महिलांच्या शाहीस्नानाला अनुमती नाकारल्यास प्रशासन व अन्य आखाडय़ांच्या विरोधात भूमिका घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
च्श्री त्रिकाल भवन्ताजी यांनी साधू-महंतांच्या आखाडय़ांना पुरुषी मनोवृत्ती संबोधून, संसारात जर स्त्रीशक्ती महान असल्याचे धर्मात सांगितले असेल, तर त्याच धर्मप्रसारासाठी एकत्र आलेल्या महिला साध्वींच्या धर्मकार्यात अडथळा आणण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल त्यांनी विचारला.
च्कुंभमेळ्यासाठी लागणा:या साधनसामग्री खरेदीकरणाचा व्यवहार अत्यंत पारदर्शीपणो व्हावा, त्यामध्ये कोणताही गैरव्यवहार केला जाऊ नये, यासाठी महासंचालक संजीव दयाल यांनी पोलीस मुख्यालयात नियोजन व समन्वय विभागाचा अपर महासंचालक उपलब्ध असतानाही ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे अधिकार महानिरीक्षक प्रभातकुमार यांना दिले आहेत, असे खात्रीशीर सूत्रंकडून सांगण्यात आले.
साधुग्रामचा गोंधळ
साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यासाठी टीडीआर ठरवण्यावरून नाशिकमध्ये गोंधळ उडाला आहे. दहापट टीडीआरचा प्रस्ताव फेटाळल्याचे प्रशासनाचे म्हणणो आहे तर प्रस्ताव फेटाळला नसल्याचा दावा लोकप्रतिनिधींनी केला आहे. उभयतांमधील असमन्वयाने शेतकरी मात्र गोंधळात सापडले आहेत. नाशिकच्या महापौरांनी बोलावलेल्या बैठकीत शेतक:यांची समजूत काढताना एकच गोंधळ उडाला. साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध
व्हावी हा प्रस्तावच मुळात महापालिकेचा. तो शासनाकडे पाठविताना भूसंपादनाची
जबाबदारी महापालिकेने शासनाकडे सोपवली.