मुंबई : कोरोनाच्या सूक्ष्म विषाणूने संपूर्ण जग हादरले. संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात उपचारांची दिशा ठरलेली नव्हती, तर दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. यानंतर लसीकरण सुरू झाल्याने अन् संसर्गाची तीव्रता कमी झाल्याने सुटकेचा निःश्वास सोडला. परंतु, कोरोनाच्या या तीन लाटांमध्ये १ ते १० वर्षांमधील २३२ लहानग्यांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे.राज्याच्या कोरोना मृत्यू विश्लेषण अहवालातील निरीक्षणानुसार, या वयोगटात २,४७,७५७ लहानग्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर या वयोगटात पहिल्या लाटेत ९७, दुसऱ्या लाटेत ११७ आणि तिसऱ्या लाटेत १८ बळींची नोंद झाली आहे. याखेरीज, देशातील कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा इशारा देण्यात आला होता. परंतु, या लाटेत लहानग्यांना संसर्ग कमी झाल्याचे समोर आले आहे. यामुळे पालक तसेच डॉक्टरांनी सुटकेच्या निश्वास सोडल्याचे दिसून आले.
या कारणामुळे कोरोना मृत्यूंत वाढ - केंद्रीय आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार, कोरोना रुग्णांचा सहव्याधीमुळे मृत्यू ओढवल्यास या रुग्णांच्या मृ्त्यूंची नोंद कोरोनाबाधित म्हणून करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ही प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे पहिल्या लाटेत १९००, दुसऱ्या लाटेत २६०० रुग्णांचे मृत्यू वाढले आहेत. तिसऱ्या लाटेच्या नोंदीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
मृत्यू विश्लेषणाने विषाणूचा सखोल अभ्यासकोरोना वा सहव्याधींमुळे झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचा अभ्यास सातत्याने करण्यात येत आहे. यामुळे कोरोनासारख्या सूक्ष्म विषाणूचा सखोल अभ्यास करता येईल. शिवाय, यामुळे संशोधनाच्या व अभ्यासाच्या दृष्टीने हे काम सोपे होईल.- डॉ. अविनाश सुपे, कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख
१- १० वयोगट कालावधी रुग्ण मृत्यूपहिली लाट ६७११० ९७दुसरी लाट १४६२९८ ११७तिसरी लाट ३४३४९ १८ एकूण २४७७५७ २३२