शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

कॉल सेंटरद्वारे २३३ कोटींची फसवणूक

By admin | Published: October 06, 2016 5:48 AM

तब्बल साडेसहा हजार अमेरिकी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या मीरा रोडमधील बोगस कॉल सेंटरवर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी छापा टाकत ७७२ जणांना ताब्यात घेतले

ठाणे/मीरा रोड : तब्बल साडेसहा हजार अमेरिकी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या मीरा रोडमधील बोगस कॉल सेंटरवर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी छापा टाकत ७७२ जणांना ताब्यात घेतले. त्यापैकी ७० जणांना अटक करण्यात आली. भारतीय महसूल सेवेचे अधिकारी असल्याची बतावणी करून, त्यांनी २३३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.परदेशी नागरिकांना प्रलोभन दाखवत, प्रसंगी धमक्या देत, त्यांच्या गिफ्टकार्ड नंबर मिळवून फसवणूक होत होती. पोलिसांनी उर्वरित ६३० जणांना नोटीस बजावली. या कारवाईत ८५१ हार्ड डिस्क, लॅपटॉप आणि कॉल सेंटरमधील सामग्री असा सुमारे एक कोटींचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली. या कॉलसेंटरमधून दररोज एक ते दीड कोटींची व वर्षाला ४०० कोटींची उलाढाल होत असल्याचे आढळून आले. (प्रतिनिधी) अशी होत असेल फसवणूक ? कॉल सेंटरमधून परदेशी नागरिकांना करासंदर्भात धमकी दिली जाई किंवा वेगवेगळी प्रलोभने दाखविल्यानंतर त्यांना पैसे देण्यास सांगितले जाई. त्यासाठी गिफ्टकार्ड खरेदी करण्यास भाग पाडले जात असे. नंतर त्या कार्डच्या खात्यात पैसे जमा करण्यास सांगून, त्या कार्डचा १६ अंकी क्रमांक विचारला जात असे. तो मिळाल्यावर त्या कार्डद्वारे पैसे वसूल केले जात. यातील २० टक्के रक्कम कमिशनपोटी गिफ्टकार्ड विकणाऱ्याला, तर ८० टक्के रक्कम ही भारतातून फोन करणाऱ्याला मिळायची.ही रक्कम हवालाद्वारे दिली जायची की बँक खात्यातून पाठवली जायची, याचा तपास करण्यात येत आहे. तपासासाठी कॉल सेंटर्सचालकांची बँक खातीही गोठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हैदरअली मन्सुरी (२४, कॉलसेंटर संचालक), शहीन उर्फ हमजा बालेसार (३५), कबीर गुप्ता (२६), अर्जुन वासुदेव (२४, कॉलसेंटर व्यवस्थापक), अब्दुल्ला झरीवाला (२२), जॉन्सन डॉन्टोसा (२४, कॉलसेंटर व्यवस्थापक), गोविंद ठाकूर (२८), अंकित गुप्ता (१९) यांच्यासह ७० जणांना अटक झाली.सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे आणि ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी रात्री मीरा रोडच्या पेणकरपाड्याचे हरी ओम आयटी पार्क, बाले हाउस, युनिव्हर्सल आउटसोर्सिंग सर्व्हिसेस आणि ओसवाल हाउस येथील सात कॉल सेंटरवर छापे टाकण्यात आले. 40 अधिकारी आणि १२० कर्मचाऱ्यांच्या या कारवाईत ७७२ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यातील ७० जणांना अटक करण्यात आली. ६३० जणांना नोटीस बजावली. ७२ कर्मचाऱ्यांना चौकशीनंतर सोडण्यात आले.