कोल्हापूर : हुपरी (ता. हातकणंगले) पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या शिवशांत बाळासाहेब माळी , नीलेश चंदू बनसोडे व नीळकंठ माने (हुपरी) या तिघांनी शासकीय खात्यामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून विविध जिल्ह्यांतील सुमारे २३९ तरुणांची अडीच ते तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.शिवशांत माळी, नीलेश बनसोडे व नीळकंठ माने या तिघांनी अनेक नातलग, मध्यस्थ व मित्रमंडळींच्या ओळखीच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आदी जिल्ह्यांतील सुमारे २३९ तरुणांकडून ५० हजारांपासून पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम लाटली. महाराष्ट्र राज्य मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाबरोबरच अन्य शासकीय खात्यांत नोकरी देण्याचे आमिष दाखविले तसेच काही तरुणांना बोगस निवड पत्रेही दिली. त्यातून सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचेही तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी अरुण पोपट फडतारे (रा. वाळवेकर नगर, हुपरी) या तरुणाने हुपरी पोलिसांत सर्वप्रथम गुन्हा दाखल केला होता. (वार्ताहर)
नोकरीच्या आमिषाने २३९ तरुणांना गंडा
By admin | Published: September 26, 2016 3:42 AM