शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

मुसळधार कोसळणा-या पावसामुळे राज्यातील २४ धरणे ओव्हर फ्लो, चिंता मिटली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 6:30 AM

राज्यात दोन दिवसांत पावसाने जोर धरल्याने, ३७ पैकी २४ धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यातून आता पाणी सोडणे सुरू झाले आहे. पुणे विभागातील १८ पैकी १६ धरणांतून पाणी सोडले आहे.

अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यात दोन दिवसांत पावसाने जोर धरल्याने, ३७ पैकी २४ धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यातून आता पाणी सोडणे सुरू झाले आहे. पुणे विभागातील १८ पैकी १६ धरणांतून पाणी सोडले आहे. मराठवाड्यातील जायकवाडी आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोयना धरण पूर्णपणे भरत आले आहे. त्यातील जलसाठा कमाल पातळीला पोहोचल्यानंतर धरणांचे दरवाजे उघडावे लागतील, असे जलसंपदामंत्रीगिरीश महाजन यांनी सांगितले. बुधवारी सकाळी ८ वाजल्यापासून निरा देवघर सांडव्याचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून, ३,६४० व पावरहाउसमधून ७५० असे एकूण ४,३९० क्युसेक्स पाणी नीरा नदीत सोडले जात आहे. वडीवळेमधून १३७, भाटघरमधून २,१६७ आणि मुळशीमधून ७००० क्युसेक्स पाणी सोडले जात असल्याचे ते म्हणाले.नाशिक जिल्ह्यात पावसाने नदी, नाल्यांना पूर आला आहे. खरिपाच्या पेरण्या शंभर टक्क्यांपेक्षा अधिक झाल्या आहेत. २० सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या ११२ टक्के पाऊस झाला आहे. इगतपुरी, त्र्यंबकला अतिवृष्टीची नोंद झाली. मालेगाव, नांदगाव, कळवण, बागलाण, देवळा हे तालुके कोरडेच आहेत.>तर जायकवाडीचे दरवाजे उघडणारजायकवाडी धरणात पाण्याची मोठी आवक सुरू आहे. वरच्यासर्व धरणांतून मोठा विसर्ग सुरू असल्यामुळे, धरणात १,९२५.३० दलघमी पाणीसाठा (क्षमता २,१७१ दलघमी) झाला आहे. ते २,१७१ च्या वर गेल्यास दरवाजे उघडावे लागतील. कोयना धरणाने २८०४.८६ दलघमीची पातळी (क्षमता २,८२६ दलघमी) ओलांडल्याने सहा दरवाजे उघडण्यात आल्याचे महाजन म्हणाले.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी विदर्भात जोरदार, कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.>विदर्भात ‘पाणी’बाणी३३.३८ टक्के पाणीसाठा अमरावती विभागामधील धरणांत जमा आहे. तर ३५.६९ टक्के पाणीसाठा नागपूर विभागामधील धरणांत जमा आहे.