पंढरपूर : कार्तिकी वारीनिमित्त १२ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन २४ तास खुले राहणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली. कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा १९ नोव्हेंबर रोजी आहे.
वारकरी सांप्रदायात आषाढीनंतरची महत्वाची यात्रा म्हणजे कार्तिकी वारी. या वारीसाठी मुंबई, कोकण, मराठवाडा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक येतात़ त्यामुळे भाविकांना सुलभ आणि जलदगतीने दर्शन व्हावे यासाठी प्रशासनाची तयारी सुरू आहे. यात्रा काळात देवाची नित्यपूजा पहाटे ३.३०, महानैवेद्य सकाळी ११ वाजता आणि लिंबू पाणी रात्री ९ वाजता देण्यात येईल. या कालावधीसाठी दर्शन बंद राहणार आहे. उर्वरित वेळेत भाविकांना दर्शन घेता येणार आहे़ शिवाय यात्रा काळात भाविकांना दर्शन लवकर व्हावे, यासाठी व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.शेतकरी संघटनेच्या चक्काजाम आंदोलनामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर समितीकडून रविवारी दिवसभर अन्नछत्र चालू ठेवण्यात आले़सलग सुट्यांमुळे गर्दीदिवाळीनंतर आलेले शनिवार , रविवार आणि शाळांना असलेल्या दिवाळीच्या सुट्ट्या यामुळे पंढरीत भाविकांची गर्दी झाली आहे. निवासासाठी मठ, लॉजही हॉऊसफूल झाले असून चंद्रभागा वाळवंट आणि दर्शन रांगेतसुद्धा भाविकांची दाटी दिसून येत आहे़