अविनाश कोळी
सांगली : कोरोना काळात अनेक महिन्यांचा लॉकडाऊन व त्यामुळे घटलेली रस्त्यावरील वाहनांची संख्या अपघाताचा आलेख कमी करण्यास कारणीभूत ठरली आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण तब्बल २४ टक्क्यांनी घटले आहे. त्याचबरोबर राज्यात अपघाती मृत्युदराची सर्वाधिक घट पुणे, औरंगाबाद, सिंधूदुर्ग शहरात नोंदली गेली आहे.
राज्यातील अपघाताची संख्या व त्यातील मृत्युदर कमी करण्यासाठी ‘इंटेलिजंट ट्रफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे २०१८ ते २०२० या काळातील अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात घटत होते. कोरोना काळात मोठा लॉकडाऊन लागल्याने राज्यातील अपघातांच्या प्रमाणात अभूतपूर्व घट नोंदली गेली.
चार जिल्ह्यात ३० टक्के अपघातपुणे, सोलापूर, अहमदनगर व नाशिक या चार जिल्ह्यांतील अपघातांची संख्या राज्यातील एकूण अपघातात ३० टक्के इतकी आहे. दुसरीकडे २०२० मध्ये झालेल्या एकूण अपघाती मृत्यूमध्ये २६ टक्के म्हणजेच एकूण ३ हजार ३६ मृत्यू नाशिक ग्रामीण (८०१) , पुणे ग्रामीण (६९६), अहमदनगर (६४२), जळगाव (४७२), सोलापूर ग्रामीण (४२५) या भागात नोंदले गेले.
अनलॉक होताच पुन्हा वाढलॉकडाऊनमध्ये अपघातांच्या प्रमाणात मोठी घट झालेली असताना अनलॉक काळात मात्र अपघातांचे प्रमाण अचानक वाढल्याचे दिसत आहे. डिसेंबर २०२० या एकाच महिन्यात राज्यात ३०७२ अपघात व १ हजार ४६२ मृत्यू नोंदले गेले. याउलट एप्रिल २०२० या महिन्यात सर्वांत कमी ५७२ अपघात व ३०३ मृत्यू नोंदले गेले आहेत.
२०१९ २०२० घट %एकूण अपघात ३२,९२५ २४,९७१ २४मृत्यू १२,७८८ ११,५६९ १०गंभीर अपघात १२,१९७ ९,०९४ २५किरकोळ दुखापत ५,४७३ ३,४३२ ३७