भाईंदर : भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडल्याचा परिपाक म्हणून की काय, काशिमीरा येथील काशिगाव भाजी मार्केटमधून सुमारे 24 हजारांचे टोमॅटो प्लॅस्टिक कंटेनरसह अज्ञात चोरटय़ांनी लंपास केल्याची विचित्र आणि तितकीच मजेशीर घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली़ या प्रकरणी काशिमीरा पोलिसांत गुन्हा दाखल केल्याचे सहायक पोलीस निरीक्षक अर्चना दुसाणो यांनी सांगितले.
येथील काशिगाव भाजी मार्केटमध्ये राम अशोककुमार प्रजापती (35, रा. माशाचा पाडा, काशिमीरा) यांचा होलसेल भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. राम यांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास भाजी मार्केटमधील आपल्या ठेल्यात सुमारे 3क्क् किलो टोमॅटो प्लॅस्टिक कंटेनरसह झाकून ठेवले होते. सध्या टोमॅटा 8क् रु. प्रति किलो अशा महागडय़ा दराने विकला जात आहे. मात्र टोमॅटो चोरणार तरी कोण, असा सवाल स्वत:लाच करून राम निर्धास्तपणो आपल्या घरी गेले. शनिवारी सकाळच्या सुमारास ते आपल्या ठेल्याजवळ आले असता त्यांना तेथील टोमॅटो प्लॅस्टिक कंटेनरसह गायब झाल्याचे आढळून आले. सुरुवातीला त्यांनी आसपासच्या भाजी विक्रेत्यांकडे चौकशी केली. परंतु, त्यांना आपली मौल्यवान टोमॅटो गवसली नाहीत. अखेर त्यांनी सायंकाळच्या सुमारास काशिमीरा पोलीस ठाणो गाठून टोमॅटो चोरीची फिर्याद नोंद केली. कंटनेरच्या किंमतीसह ही चोरी सुमारे 44 हजार रुपयांची असून, ती पोलिसांनी गांभीर्याने घेतली आहे. (प्रतिनिधी)
या प्रकरणी शहानिशा करून पोलिसांनी अखेर महागडा टोमॅटो चोरी केल्याचा गुन्हा अज्ञात चोरटय़ांविरोधात दाखल करून त्यांचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. चोरटा सापडल्यास टोमॅटोचा मुद्देमाल त्यांना जप्त करता येईल की नाही, यावर पोलिसांकडूनच साशंकता वर्तविण्यात येत आहे.