ठाणे : कृष्ण निवास इमारत दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने शहरातील २ हजार ४४६ धोकादायक इमारतींना पुन्हा नोटिसा पाठविल्या आहेत. कृष्ण निवास इमारतीच्या जवळ असलेली कमलाजी भवन ही इमारत दोन महिन्यांपूर्वीच पालिकेने पाडण्यास सुरुवात केली होती. तर कृष्ण निवासच्या मागे असलेल्या गणेश दर्शन या इमारतीला पालिकेने नोटीस बजावल्याने या इमारतीत वास्तव्य करणारी ३१ कुटुंबे धास्तावली आहेत. या इमारत दुर्घटनेनंतर पालिका आयुक्तांनी धोकादायक इमारतींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या धोकादायक इमारतींना पुन्हा नोटिसा बजावण्याचे काम सुरू झाले आहे.
२४४६ इमारतींना पुन्हा नोटिसा
By admin | Published: August 07, 2015 1:31 AM