मुंबई : रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वेचा वक्तशीरपणा सुधारण्यावर भर दिला जात असून तसे आश्वासनच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून देण्यात आले होते. यानंतर २०१६ च्या जानेवारी ते जून महिन्यामध्ये देशभरातील २,५०० स्थानकांत रेल्वे दिरंगाईचे प्रमाण ३० टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळले आहे. एका संकेतस्थळाने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली. यात महाराष्ट्रातील ट्रेन सरासरी २५ ते २६ मिनिटे उशिराने धावत आहेत. या सर्वेक्षणासाठी जगभरातील रेल्वेच्या दिरंगाईचे परिमाण मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धतीचा उपयोग करण्यात आला. ट्रेन सुटण्याच्या मूळ स्थानकापासून ती गंतव्य स्थानकात पोहोचण्याची वेळ यात धरली गेली, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. दोन स्थानकांदरम्यान ट्रेन उशिराने पोहोचली तर ती वेळ धरली जात नाही. रेल्वे कमी विलंबाने धावत असलेल्या पाच राज्यांमध्ये गुजरात, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, झारखंड व कर्नाटकचा समावेश आहे. सर्वात विलंबाने धावत असलेल्या राज्यांमध्ये बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा व तेलंगणाचा समावेश आहे. यासाठी १० लाखांहून अधिक ट्रेनच्या प्रवासाच्या वेळेचा विचार करण्यात आला. रेल्वे दिरंगाईबाबत प्रवाशांच्या येणाऱ्या तक्रारींची दखल रेल्वेकडून गांभीर्याने घेण्यात आली होती. त्यानुसार वक्तशीरपणा सुधारण्यावर भर देण्यात आला आणि कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर एका संकेतस्थळाने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली. गुजरातमध्ये १४ मिनिटे, तामिळनाडूत १९ मिनिटे, पश्चिम बंगालमध्ये २३ मिनिटे तर झारखंडमध्ये २४ मिनिटे आणि कर्नाटकमध्ये २६ मिनिटे ट्रेन उशिराने धावतात. बिहार व उत्तर प्रदेशात हाच विलंब ५५ ते ६१ मिनिटांपर्यंतचा आहे. महाराष्ट्रातील ट्रेन या सरासरी २५ ते २६ मिनिटे लेट धावतात, असेही सर्वेक्षणातून उघड झाले आहे. यासाठी ८२ स्थानकांचा सर्व्हे करण्यात आला. (प्रतिनिधी)कल्याण- ट्रेन क्रमांक १२१३८ मुंबई सीएसटी पंजाब मेल आणि ट्रेन क्रमांक १५०१८ गोरखपूर-मुंबई एलटीटी काशी एक्स्प्रेसला लेटमार्क एलटीटी- क्रमांक १२१७४ प्रतापगड-मुंबई एलटीटी उद्योग नगरी एक्स्प्रेस, ११०८२ गोरखपूर-मुंबई एलटीटी कामयानी एक्स्प्रेसला लेटमार्कसीएसटी- १२३६१ आसनसोल-मुंबई सीएसटी एक्स्प्रेस आणि १२५३३ लखनौ-मुंबई सीएसटी पुष्पक एक्स्प्रेसला लेटमार्क.मुंबई सेंट्रल- ट्रेन क्रमांक २२२१० नवी दिल्ली-मुंबई सेंट्रल दुरोन्तो एक्स्प्रेस आणि १२९५४ दिल्ली निजामुद्दीन-मुंबई सेंट्रल आॅगस्ट क्रांती राज एक्स्प्रेसला लेटमार्क
महाराष्ट्रातील ट्रेन २५ ते २६ मिनिटे ‘लेट’
By admin | Published: September 15, 2016 2:44 AM