ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - मतदानाचा दिवस आला की अनेजकण सुट्टीचा फायदा घेत पिकनिक प्लान करतात आणि शहराबाहेरचा रस्ता धरतात. त्यामुळे जास्तात जास्त लोकांनी मतदान करावं यासाठी शासनाकडून सकारात्मक पावलं उचलण्यात येत आहेत. येत्या स्थानिक स्वराज संस्थेत मतदान केल्यास हॉटेलिंगमध्ये 25 टक्क्यापर्यंतची सूट मिळणार आहे. मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीने शासनातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने पुढाकार घेत ही खास सवलत दिली आहे. सवलत मिळवण्यासाठी मतदानाची खूण आणि आवश्यक बाबींची पूर्तता करावी लागणार आहे. त्यानंतर सरकारी किंवा खासगी हॉटेलमध्ये 25 टक्क्यांची सवलत मिळणार आहे.