पुणे : लोकसंख्या वाढली, माणसांइतकीच वाहने झाली; रस्ते मात्र जसे आहेत तसेच राहिले. फार तर त्यांची रुंदी थोडी वाढली; मात्र त्यांच्या मूळ स्वरूपात काहीही बदल झाला नाही. हेच लक्षात घेऊन महापालिका आता शहरातील तब्बल २५ रस्ते परदेशातील रस्त्यांच्या धर्तीवर नवे करीत आहे. महापालिकेने काही खासगी कंपन्यांना या रस्त्यांच्या डिझाईनचे काम दिले असून, त्यातून या रस्त्यांचे स्वरूपच पूर्णपणे बदलून जाणार आहे.शहरातील वाहनांची संख्या वाढत असली, तरी त्यांची रुंदी वाढविणे आता शक्य नाही. तरीही वाहतुकीला शिस्त लावायची असेल, तर काय करता येईल, या विचारातून परदेशातील रस्त्यांच्या धर्तीवर हे रस्ते नव्याने तयार करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. रस्त्यांबरोबरच त्यांना जोडून असलेल्या पदपथांचाही यात समावेश आहे. रस्त्यांचा आकार कसा आहे, त्याची लांबी किती आहे, त्यावरची वाहतूक किती या सर्व गोष्टींचा विचार करून रस्त्यांचे डिझाईन तयार करण्यात येणार आहे. ते करताना रस्त्याची गरज काय आहे, हेही पाहिले जाईल.परदेशातील रस्त्यांना असतात तशा लेन (पट्टे आखून निश्चित केलेले मार्ग) या रस्त्यांवर तयार करण्यात येणार आहेत. बस असेल तर बससाठीच्या लेनमधूनच जाईल (बीआरटी), स्वयंचलित खासगी चार चाकी वाहनांसाठी स्वतंत्र लेन असेल. त्या-त्या वाहनांकडून या लेन बदलल्या जात नाहीत; त्याचबरोबर सायकल चालविणाऱ्यांसाठी पदपथाच्या कडेने एक स्वतंत्र लेन तयार करण्यात येईल. एखाद्या रस्त्यावर त्याच्या अरुंदपणामुळे हे करणे शक्य नसेल तिथे वाहन लावण्यासाठी स्वतंत्र वाहनतळ बांधण्यासारख्या उपायांचा अवलंब करण्यात येणार आहे. >सुरक्षेचा विचार करून सायकल ट्रॅक : वाहतूककोंडी टळणारपदपथांचाही यात स्वतंत्रपणे विचार करण्यात आला आहे. पदपथांवरून फिरणे आनंददायी करण्याचा प्रयत्न यात असेल. त्यासाठी विशिष्ट अंतरांवर बसण्यासाठी जागा, शिस्तीत बसलेले विक्रेते, ग्रीनरी या पदपथांवर असेल. सायकल ट्रॅकची रचनाही सुरक्षेचा विचार करून करण्यात येणार आहे.शहरासाठी १ हजार ५०० वाहने घेण्याचा ठराव सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे. ७५ किलोमीटर लांबीचे पदपथ तयार करण्यात येतील. २५ किलोमीटरचा सायकल ट्रॅक व ३० किलोमीटरचा बीआरटी मार्ग तयार करण्यात येणार आहे. नव्या गाड्या रस्त्यावर आल्या, तरीही वाहतुकीची कोंडी होणार नाही, अशा पद्धतीने रस्त्यांचे डिझाईन करण्यास या कंपन्यांना सांगण्यात आले आहे. त्यांनी सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. सुचविलेल्या उपायांचा प्राथमिक खर्चही त्यांनी अहवालासोबत प्रशासनाला द्यायचा आहे. ६ महिन्यांत हे काम पूर्ण होणार असून, त्याची तयारी संबंधित कंपन्यांनी सुरू केली आहे.रस्त्यावरच्या प्रत्येक चौकात तिथे येणारी, थांबणारी, सिग्नल मिळाला की पुढे जाणारी, सिग्नल तोडून पुढे जाणारी सर्व वाहने नियंत्रण कक्षात मॉनिटरवर दिसतील, अशी यंत्रणा प्रत्येक रस्त्यावर असेल.
तब्बल २५ रस्ते होणार चकाचक
By admin | Published: August 27, 2016 12:51 AM