सध्या सरकारी रुग्णातील डॉक्टरर्स, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी मठ्या प्रमाणात एन ९५ मास्क, ट्रिपल लियर मास्कची गरज असून त्यानुसार ३६ लाख एन-५ मास्क व ८० लाख ट्रिपल लेअर मास्क खरेदी केले जाणार आहेत.कोरोना चाचण्या करण्यासाठी आजपर्यंत केंद्र सरकारकडून तपासणी किट दिले जात होते; मात्र आता ते राज्यांनी स्वत: विकत घ्यावे असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता करोना चाचणीसाठी लागणारे ३५ लाख आरटीपीसीआर किट राज्य सरकार विकत घेणार आहे. याचा अर्थ येत्या काळात ३५ लाख तपासण्या करण्याचे नियोजन राज्य सरकारने केले आहे. त्याशिवाय ६० लाख रॅपिड अँटीजन टेस्ट किट देखील खरेदी करण्यात येणार आहेत. ४ लाख ८० हजार लिक्विड आॅक्सिजन, तर ४ लाख जम्बो आॅक्सिजन रिफिलिंग सिलेंडर खरेदी करण्यात येणार आहेत.संपूर्ण खरेदी प्रक्रिया राबवताना केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून राबवावी, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वस्तूची खरेदी होणार नाही याची देखील काळजी विभागाने घ्यायची आहे, असेही या आदेशात म्हटले आहे. मात्र ही सगळी खरेदी हापकिन संस्थेमार्फत केली जाणार की नाही याविषयी या आदेशात कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. सरकारने सर्व विभागांना लागणारी औषध खरेदी हापकिन संस्थेच्या मार्फतच होईल, असे शपथपत्र उच्च न्यायालयात दाखल केले आहे. असे असताना साडेसहाशे कोटींची खरेदी ही कोणामार्फत होणार याविषयी या आदेशात स्पष्टता नाही.लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी औषधे वैद्यकीय यंत्रसामुग्री आणि अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाला ६३३ कोटी ९२ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या पैशातून अडीच लाख रेमडेसीव्हीर इंजेक्शन, फेविपीरावीरच्या तीन लाख गोळ्यांच्या स्ट्रीप तसेच अन्य साहित्यांची खरेदी करण्यात येणार आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंतची गरज लक्षात घेऊन ही तरतूद करण्यात आली आहे.रेमडेसीव्हीरचा तुटवडाराज्यात रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल असून चढया दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत र्औषध विक्रेत्यांकडे विचारणा केली असता औषध निर्माण कंपनीकडूनच पुरेसा पुरवठा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र,हा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला असून या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे कोरोना रुग्णांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.आकडे बोलतात...औषध दर संख्यारेमडेसीव्हीर २१८२.८८ २४४२००फेविपीरावीर ८४७.४६ २७०००आरटी-पीसीआर कीट ७८.४० ३५०००००रॅपिड अँटिजन कीट ४९३ ६०००००आॅक्सिजन रिफिलिंग २५० ४८००००लिक्विड आॅक्सिजन २५००० ४०००एन ९५ मास्क ४७.७७ ३६०००००ट्रिपल ले. मास्क ६.५० ८०००००
२.५० लाख रेमडेसीव्हीर, १ कोटी १६ लाख मास्क !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2020 2:37 AM