वसई : रेती व्यावसायिकांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ केलेल्या महामार्ग रोकोप्रकरणी येथील माजी खासदार बळीराम जाधव आणि जिल्हा परिषद सदस्यांसह २५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेतीउपसा बंद असतानाही महसूल अधिकाऱ्यांनी रविवारी खानिवडे, कशीदकोपर आणि खराडतारा बंदरातील बोटी आणि संक्शन पंप निकामी केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या रेती व्यावसायिकांनी खानिवडे जुन्या टोलनाक्याजवळ महामार्ग अडवून धरला. या आंदोलनात माजी खासदार बळीराम जाधव, पालघर जिल्हा परिषदेच्या सदस्या कल्याणी तरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. दोन तास महामार्ग बंद झाल्यामुळे मुंबई आणि गुजरातकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.
माजी खासदारासह २५० जणांवर गुन्हा
By admin | Published: November 11, 2016 5:50 AM