शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"भाजपने डॉग स्कॉड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
4
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
6
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
7
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
8
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
9
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
10
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
11
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
12
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
13
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
14
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
15
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
16
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
17
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
18
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
19
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
20
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."

26/11 Mumbai Attacks: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे सावट कायम; २६/११ हल्ल्याच्या कटू आठवणींना १४ वर्षे पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 7:38 AM

समुद्रमार्गे आलेल्या दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी दि. २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईला टार्गेट केले होते. या भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये ३४ विदेशी नागरिकांसह एकूण १६६ जणांना जीव गमवावा लागला होता, तर सुमारे ७०० जण जखमी झाले होते.

मुंबई :  देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मायानगरी मुंबईवर करण्यात आलेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्याला १४ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र एवढ्या प्रदीर्घ काळानंतरही या महानगरावरील दहशतवादाचे सावट कायम आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

समुद्रमार्गे आलेल्या दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी दि. २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईला टार्गेट केले होते. या भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये ३४ विदेशी नागरिकांसह एकूण १६६ जणांना जीव गमवावा लागला होता, तर सुमारे ७०० जण जखमी झाले होते. पोलिस जवानांनी हा हल्ला परतवून लावत नऊ दहशतवाद्यांना कंठस्नान घालत अतिरेकी अजमल कसाब याला जिवंत पकडले. पुढे त्याला फासावर चढविण्यात तपास यंत्रणांना यश आले. या हल्ल्यात १८ पोलिस जवानांना वीरमरण आले. मुंबईवरील या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रातील एनएसजी कमांडोंच्या धर्तीवर मुंबईत शक्तिशाली अशा शीघ्र कृती दल आणि फोर्स वनची स्थापना करण्यात आली. अतिरेकी हल्ला परतवून लावण्याचा नियमित सराव या पथकांकडून करण्यात येतो. तसेच मुंबई पोलिस दलाला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, वाहने, सीसीटीव्ही यंत्रणा आणि यंत्रसामुग्रीने सज्ज करण्यात आले आहे. 

या हल्ल्याच्या स्मृतिदिनी मुंबई पोलिस जिमखान्यासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कामा हॉस्पिटल, नरिमन हाऊस, हॉटेल ताज, हुतात्मा स्मारक, गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणांसह शहरातील विविध शाळा, कॉलेज, महाविद्यालये, तसेच सामाजिक संस्थांकडून हल्ल्यातील शहीद जवानांना मानवंदना देत आदरांजली वाहण्यात येणार आहे. 

पोलिस आयुक्त कार्यालयात अभिवादन संचलन कार्यक्रम -या हल्ल्यात शहीद झालेल्या अधिकारी आणि जवानांना मानवंदना देण्यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयात  “अभिवादन संचलन कार्यक्रम” आयोजित करण्यात आला आहे. 

२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईला टार्गेट केले होते. या हल्ल्यामध्ये ३४ विदेशी नागरिकांसह एकूण १६६ जणांना जीव गमवावा लागला होता.

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रPakistanपाकिस्तान