शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
4
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
5
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
6
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
7
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
8
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
9
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
10
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
11
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
12
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
13
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
14
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
15
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
16
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
17
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
18
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
19
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
20
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

नीरा-नृसिंहपूरसाठी २६० कोटी

By admin | Published: March 03, 2016 4:53 AM

पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र निरा-नृसिंहपूर व कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील विकासकामे मंजूर आराखड्यानुसार तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री

मुंबई : पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र निरा-नृसिंहपूर व कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील विकासकामे मंजूर आराखड्यानुसार तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. या कामांसाठी अनुक्रमे २६०.८६ कोटी आणि १२१.६४ कोटी रुपये खर्च करण्यास त्यांनी मान्यता दिली. या तीर्थक्षेत्रांच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस सहकारमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार उल्हास पाटील, इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर-सिंह, वनविभागाचे सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे, पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार आदी अधिकारी उपस्थित होते.श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे होणाऱ्या ‘कन्यागत महापर्वकाळ’ सोहळ्याकरिता १२१.६४ कोटी रुपयांच्या निधीस मुख्यमंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली असून, या आराखड्यानुसार करावयाच्या विविध विकासकामांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर, श्रीक्षेत्र निरा-नृसिंहपूर (ता. इंदापूर, जि. पुणे) या देवस्थान विकासासाठी २६० कोटी ८६ लाख रुपयांचा विकास आराखडा जिल्हा समितीने शिखर समितीकडे सादर केला आहे. सदर आराखड्यास राज्यस्तरीय शिखर समितीची मान्यता घेऊन तातडीने कामे पूर्ण करण्यात यावी, असे आदेश फडणवीस यांनी दिले. या वेळी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर व श्रीक्षेत्र निरा-नृसिंहपूर ता. इंदापूर पुणे यांचे सादरीकरण करण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)