शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
2
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
3
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
4
'शरद पवार कुटुंब फुटू देणार नाहीत', छगन भुजबळांचं विधान
5
पडद्यामागून भाजपाची वेगळीच 'रणनीती'?; मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ढसा ढसा रडले, १०० तासानंतर घरी परतले, कुठे गेले, कोणाला भेटले, श्रीनिवास वनगांनी काय सांगितलं?
7
एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळाच्या पडद्याआड
8
'तेव्हा' आदित्यसाठी राज ठाकरेंना पाठिंबा मागितला नव्हता; महेश सावंत यांचा खोचक टोला
9
IND vs NZ : रोहित-विराट यांना काही वेळ द्या, ते मेहनत घेत आहेत - अभिषेक नायर
10
महाराष्ट्रात फक्त 'इतक्या' जागांवर AIMIM चे उमेदवार; काय आहे ओवेसींची रणनिती? पाहा...
11
काँग्रेसला आणखी धक्के बसणार? देवेंद्र फडणवीसांनी सगळेच सांगितले; म्हणाले, “आताच नावे...”
12
"वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीने काँग्रेस विकली"; रवी राजांनंतर आणखी एका नेत्याचा गंभीर आरोप
13
बापरे! तरुणाने मोबाईल खिशात ठेवला अन् भयंकर स्फोट झाला, गंभीररित्या भाजला
14
IND vs NZ : भारताच्या पराभवानंतर अखेर गौतम गंभीरनं सोडलं मौन; टीम इंडियाच्या 'हेड'ची रोखठोक मतं
15
"धर्म की पुनर्रस्थापना हो...!"; दिवाळी निमित्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील हिंदूंना उद्देशून काय म्हणाले पवन कल्याण
16
समीकरण जुळले, आता ३ तारखेला जागा अन् उमेदवार ठरणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
17
भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल यांची अमेरिकेशी महत्त्वाची चर्चा, देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलणी
18
पीएम मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी, स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली
19
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
20
जबरदस्त तिमाही निकालानंतर 'हा' शेअर सुस्साट; घसरत्या बाजारातही जोरदार तेजी

‘शेती’च्या २६ हजार कोटींना केंद्राची कात्री, तरतुदी केल्या कमी; शेतीवर परिणाम होणार

By राजाराम लोंढे | Published: February 08, 2023 1:17 PM

राष्ट्रीय कृषी विकास योजना या महत्त्वपूर्ण योजनेतील ३१ टक्के रक्कम कापली

राजाराम लोंढेकोल्हापूर : केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात वरवर शेतकऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न केला असला तरी शेती व त्याअनुषंगीक घटकांच्या तरतुदींना मोठ्या प्रमाणात कात्री लावली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास २६ हजार कोटी शेती व शेतकऱ्यांच्या योजनांना कमी केले आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना या महत्त्वपूर्ण योजनेतील ३१ टक्के रक्कम कापली असून, त्याचे परिणाम भविष्यात शेती व शेतकऱ्यांवर होणार हे निश्चित आहे.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प मध्यमवर्गीय दिलासा देणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, देशाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी व शेतीसाठी काहीसा चिंताजनकच म्हणावा लागेल. शेती व शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या तरतुदीला २६ हजार कोटीची कात्री लावली आहे.शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेची तरतूद ३१ टक्क्यांनी कमी केली आहे. ही योजना केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार राबवत असते. कृषी क्षेत्राचा विकास दर वाढवण्यासाठी ही योजना फलतृप्त ठरत असतानाच गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याचे ३२८३ कोटी रुपये कमी केले आहेत.‘मनरेगा’ची १८ टक्क्यांनी तरतूद कमीमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम मागणाऱ्या लाभार्थ्यांना अकुशल रोजगार पुरविला जातो. बेरोजगार व गरजूंना या योजनेचा मोठा आधार असतो. मात्र, केंद्र सरकारने या योजनेचे बजेट १३ हजार काेटीने कमी केल्याने त्याचा फटका बसणार आहे.‘पी. एम. किसान’लाही लावली कात्रीप्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दर चार महिन्याला दोन हजार रुपये असे वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. त्यासाठी मागील अर्थसंकल्पात ६८ हजार काेटींची तरतूद केली होती, या अर्थसंकल्पात ६० हजार कोटींपर्यंत खाली आणली आहे.शेतीसाठी केलेल्या तुलनात्मक तरतुदी :योजना                              २०२२-२३                    २०२३-२४प्रधानमंत्री पीक विमा       १५ हजार ५०० कोटी       १३ हजार ६२५ कोटी‘पीएम किसान’               ६८ हजार कोटी              ६० हजार कोटी‘मनरेगा’                        ७३ हजार कोटी               ६० हजार कोटीराष्ट्रीय कृषी विकास       १० हजार ४३३ कोटी        ७ हजार १५० कोटीकृषिन्नोती                      ७ हजार १८३ कोटी          ७ हजार ६६ कोटी

अर्थसंकल्पातील विभागनिहाय केलेल्या तरतुदी :दूरसंचार : १.२७ लाख कोटीकृषी व शेतकरी कल्याण : १.२५ कोटीग्रामविकास : १.६० कोटीरसायने व खते : १.७८ कोटीगृहमंत्रालय : १.९६ कोटीउपभोक्ता अन्न सार्वजनिक वितरण : २.०६ कोटीरेल्वे मंत्रालय : २.४१ कोटीरस्ते वाहतूक व महामार्ग : २.४१ कोटीसंरक्षण : ५.९४ कोटी

एकीकडे शेतकऱ्यांसाठी आम्हीच काहीतरी करतो, हे भासवण्याचे काम केंद्र सरकार करत असले तरी कृषी योजनांच्या पैशाला कात्री लावली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना भविष्यात बसणार आहे. - राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी संघटना.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBudgetअर्थसंकल्प 2023Farmerशेतकरी