शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

राज्यात डेंग्यूचे २६२ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2016 2:29 AM

पावसाला सुरुवात झाल्यावर डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियासारखे साथीचे आजार डोके वर काढू लागतात. यंदा राज्यात पाऊस लांबल्याने आॅक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात

मुंबई : पावसाला सुरुवात झाल्यावर डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियासारखे साथीचे आजार डोके वर काढू लागतात. यंदा राज्यात पाऊस लांबल्याने आॅक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात नवीन डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात २६२ डेंग्यूचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. या वर्षी १ जानेवारी ते ३१ आॅक्टोबरदरम्यान राज्यभरात ५ हजार ६५३ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. तर, डेंग्यूमुळे २२ जणांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. मुंबईत आॅक्टोबर महिन्यात डेंग्यूचे २२८ रुग्ण आढळून आले. महापालिका क्षेत्रांमध्ये मुंबईत यंदा सर्वाधिक म्हणजे ९४१ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले, तर नाशिक येथे ७७५, पुण्यात ५९६ आणि ठाण्यात २९९ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. कोल्हापूर जिल्ह्यात २६५, नाशिकमध्ये २५३ आणि पुण्यात १७० डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. यंदा राज्यात चिकनगुनियाच्या रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. १ जानेवारी ते ३१ आॅक्टोबरपर्यंत राज्यभरात चिकनगुनियाचे २ हजार २८० रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी महापालिका क्षेत्रात २ हजार ५ तर उर्वरित ग्रामीण भागात २७५ रुग्ण आढळून आले आहेत. (प्रतिनिधी)चिकनगुनियाचेही आढळले रुग्णडेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांचा प्रादुर्भाव हा एडिस डासांपासून होतो. साचलेल्या पाण्यात या डासांची पैदास होते. राज्यात आॅक्टोबरपर्यंत पाऊस पडत असल्याने आॅक्टोबर महिन्यातही डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्ण आढळून आले आहेत. नोव्हेंबरमध्येही डेंग्यू आणि चिकनगुनियाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असल्याने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. - आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत नियमित ताप सर्वेक्षण- तापाच्या रुग्णांचे रक्तनमुने घेऊन प्रयोगशाळेत मोफत तपासणी - अधिक रुग्ण आढळून येणाऱ्या ठिकाणी धूरफवारणी अशा प्रकारच्या उपायोजना केल्या जात आहेत.- नागरिकांना सतर्कतेचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आल आहे.