नागपूर : ३० मेच्या रात्री पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारामध्ये लागलेली आग ही येथे लागलेली पहिली आग नाही. येथे अगोदरदेखील आगी लागल्या आहेत. देशातील विविध आयुध निर्माणी कारखाने, दारुगोळा गोदामांमध्ये अनेक वेळा आगी लागल्या आहेत. २९ एप्रिल २००० रोजी सर्वात मोठी आग ही भरतपूर आयुध निर्माणीत लागली होती. यात सुमारे १२ हजार टन स्फोटके व दारुगोळा नष्ट झाला होता. आतापर्यंत लागलेल्या आगींच्या तारखांकडे लक्ष टाकले असता अनेक आगी या महिन्याच्या २७ ते ३० तारखेदरम्यानच लागलेल्या आहेत. २००० सालापासून १५ मोठ्या आगी लागल्या व यातील ७ आगी या २७ ते ३० तारखांच्या मध्ये लागल्या होत्या. हा एक योगायोग असला तरी महिन्याचा शेवट हा आयुध निर्माणींसाठी अशुभच दिसून येत आहे.हजारो कोटींचे नुकसान, जीवितहानीदेखील२००० सालापासून आतापर्यंत लागलेल्या आगींमध्ये संरक्षण मंत्रालयाचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. विविध आगींमध्ये हजारो टन दारुगोळा नष्ट झाला. आयुध निर्माणी भंडारा येथे २००८ साली लागलेल्या आगीत चार जणांचे मृत्यू झाले होते. २००५ मध्ये येथे लागलेल्या आगीत तिघांचा बळी गेला होता. २००१ मध्ये पठाणकोट दारुगोळा भांडारात लागलेल्या आगीत दोघांचा जीव गेला होता. तर भद्रावती येथे २००५ साली लागलेल्या आगीत एक जण गंभीर जखमी झाला होता. बिर्धवाल दारुगोळा भांडारात २००१ साली लागलेल्या आगीत एकाचा जीव गेला होता व सुमारे सहा हजार टन स्फोटके व दारुगोळा भस्मसात झाला होता.२००० सालापासूनच्या आगीच्या घटना२९ एप्रिल २०००केंद्रीय आयुध निर्माणी, कानपूर२८ एप्रिल २०००भरतपूर लष्करी दारुगोळा भांडार२९ एप्रिल २००१पठाणकोट दारुगोळा भांडार३ मे २०००दारुगोळा भांडार, देहू रोड२९ मे २०००केंद्रीय आयुध निर्माणी, कानपूर२४ मे २००१बिर्धवाल (राजस्थान) दारुगोळा कोठार३ जून २००१दारुगोळा भांडार, शाकूरबस्ती, दिल्ली६ आॅगस्ट २००१जबलपूर आयुध निर्माणी७ जानेवारी २००२जबलपूर आयुध निर्माणी३० जानेवारी २००५आयुध निर्माणी भद्रावती२२ मार्च २००५‘कॅड’, पुलगावएप्रिल २००५आयुध निर्माणी भद्रावती१६ मे २००५आयुध निर्माणी भंडारा२००८आयुध निर्माणी भंडारा३० आॅगस्ट २०१०आयुध निर्माणी भंडारा
२७ ते ३० तारीख नेहमीच धोक्याची
By admin | Published: June 01, 2016 4:10 AM