शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

२७ गावांतील रस्ते लवकरच होणार रुंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2016 3:37 AM

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांतील रस्ता रुंदीकरणाचे काम आॅक्टोबरमध्ये हाती घेतले जाईल,

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांतील रस्ता रुंदीकरणाचे काम आॅक्टोबरमध्ये हाती घेतले जाईल, असे आश्वासन आयुक्त ई. रवींद्रन यांनी नगरसेवकांना दिले. शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी सोमवारी २७ गावांतील पाणी, रस्ते व विजेच्या प्रश्नावर आयुक्त रवींद्रन व महापौर राजेंद्र देवळेकर यांची भेट घेतली. त्यावेळी रवींद्रन यांनी पी अ‍ॅण्ड टी कॉलनी, नांदिवली, नांदिवली टेकडी, सागाव येथे होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यासंदर्भात एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून या विभागातील पाणीप्रश्न सोडवण्यात येईल, असे स्पष्ट केले. यावेळी सभागृह नेते राजेश मोरे व २७ गावांतील नगरसेवक उपस्थित होते.२७ गावांतील प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे महापालिका निधीतून हाती घेण्यात आली आहेत. परंतु, सध्याचे रस्ते खूपच अरुंद असल्यामुळे बाह्यवळण मार्गाचा पर्याय आमदार भोईर यांनी सुचवला आहे. त्याचप्रमाणे मानपाडा रोड-गांधीनगर नाल्यापासून कल्याण-शीळ रोड २४ मीटर, श्री मलंग रोड (चेतना स्कूल, नेवाळीनाक्यापर्यंत) ३० मीटर, श्री मलंग रोड-अशेळेपर्यंत डीपी रोड ३० मीटर, टाटा पॉइंट (पिंगारा हॉटेल) ते श्री मलंग रोड २४ मीटर, जय मल्हार रोड - पिसवली ते आडिवली २० मीटर, जय मल्हार रोड ते जोंधळे महाविद्यालय ३० मीटर, कल्याण-शीळ रोडपासून सोनारपाड्याचे दोन्ही रस्ते २०मीटर, कल्याण-शीळ ते उंबार्ली ते पाइपलाइन रोड ३० मीटर, मानपाडा रोड ते संदप व उसरघर ३० मीटर, मानपाडा रोड ते भोपरगाव ३०मीटर, भोपर ते कोपर स्टेशन (आयरे) १५ मीटर, मानपाडा रोड-साईबाबा मंदिर ते समर्थनगर मठ २४ मीटर, मणेरेगाव ते वसार हद्द ते एमआयडीसी अंबरनाथ रोडपर्यंत २४मीटर, व्यंकटेश पेट्रोलपंप ते रिजन्सी डीपी रोड, प्रभाग क्र मांक ८५ मधील नानासाहेब धर्माधिकारी रोड या रस्त्यांचे रु ंदीकरण करण्यात येणार आहे. रस्त्यांसाठी नगरसेवक एकत्र; विजेचे जीर्ण खांबही बदलण्याची मागणीकेडीएमसीत विकासकामांसाठी नगरसेवकांनी वज्रमूठ बांधली आहे. प्रभाग क्र मांक ११२, ११३ व ११५ चे नगरसेवक एकत्र आले आहेत. डोंबिवली विभागातील युनियन बँक ते मानपाडा रोड ते रविकिरण सोसायटी, नांदिवली नाला पूल ते धनलक्ष्मी चौकापर्यंतचा रस्ता ३०मीटर करण्यात येणार आहे.यासाठी नगरसेविका रूपाली म्हात्रे, प्रेमा म्हात्रे व आशालता बाबर यांनी पुढाकार घेतला आहे. २७ गावांमधील विजेचे खांब जीर्ण झाले आहेत. याबाबत पाहणी करून आवश्यक तेथे नवीन खांब व वीज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. याबैठकीला नगरसेविका म्हात्रे, बाबर, युवासेना तालुका सचिव योगेश म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश म्हात्रे, रवी म्हात्रे व पदाधिकारी उपस्थित होते.