शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

टोलबंदीसाठी गरज २७५० कोटींची

By admin | Published: June 28, 2016 5:32 AM

मुंबई शहरातील एन्ट्री पॉइंटवर असलेल्या पाच टोलनाक्यांवर चारचाकी वाहनांना टोल बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला

मुंबई : मुंबई शहरातील एन्ट्री पॉइंटवर असलेल्या पाच टोलनाक्यांवर चारचाकी वाहनांना टोल बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला तर त्यासाठी वर्षाकाठी २५० कोटी रुपये याप्रमाणे २ हजार ७५० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे.मुंबई महापालिकेच्या पुढील वर्षीच्या सुरुवातीला होत असलेल्या महापालिका निवडणुकीवर नजर ठेवून राज्यातील भाजपा सरकार टोलमुक्तीचा निर्णय घेऊ शकते. शिवसेनेला मात देण्याची एक संधीही यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळणार आहे. या पाच नाक्यांवरील टोलबाबत निर्णय घेण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीने टोलमुक्तीचा हिशेब सरकारला सादर केला आहे. वर्षाकाठी २५० कोटी याप्रमाणे २०२६पर्यंत २ हजार ७५० कोटी रुपयांची भरपाई देऊन चारचाकी वाहनांना टोलमुक्ती दिली जाऊ शकते. हे टोलनाके बंदच करायचे असतील तर एकमुस्त २१०० कोटी रुपयांचा बोजा शासनाला सहन करावा लागेल, असे समितीने स्पष्ट केले असल्याचे पाटील यांनी सांगितले. तथापि, सर्व प्रकारच्या वाहनांना टोलमुक्ती दिली जाणार नाही आणि देण्याचा प्रयत्न झाला तर त्याला कायदेशीर अडचणी येऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले. राज्य आधीच आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. सततच्या दुष्काळी परिस्थितीत कराव्या लागलेल्या उपाययोजनांवर हजारो कोटी रुपये खर्च झाले आहेत. राज्याच्या इतर भागात दिलेली टोलमुक्ती आणि एलबीटी माफ करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे आर्थिक गणित आणखीच बिघडले आहे. दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत फायद्याचे गणित मांडताना टोलमुक्ती दिली पाहिजे, असा विचारदेखील आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की मुंबईच्या टोलमुक्तीबाबत सरकार सकारात्मक आहे पण प्रश्न पैशांचा आहे. त्यामुळे वित्त विभागाशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल. (विशेष प्रतिनिधी)टोल बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला तर त्यासाठी वर्षाकाठी २५० कोटी रुपये याप्रमाणे २ हजार ७५० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे. वर्षाकाठी २५० कोटी याप्रमाणे २०२६पर्यंत २ हजार ७५० कोटी रुपयांची भरपाई देऊन टोलमुक्ती देता येणे शक्य आहे.